Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Election : करमाळ्यातील आदिनाथ साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

Adinath Cooperative Sugar Factory : करमाळा तालुक्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेला हा कारखाना आहे. गेल्या काही वर्षांपासून कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली.

Team Agrowon

Solapur News : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून, येत्या १७ एप्रिलला कारखान्यासाठी मतदान होईल, तर १९ एप्रिलला निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.

करमाळा तालुक्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेला हा कारखाना आहे. गेल्या काही वर्षांपासून कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली. पण त्यानंतरही कारखान्याच्या कारभारात सुधारणा झाली नाहीच, शिवाय हंगामही होऊ शकला नाही.

पण या कारखान्यावर राजकारण मात्र जोरात रंगले. आता मात्र निवडणूक जाहीर झाली आहे, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारणाचे चित्र काहीसे बदलल्याने आता या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...असा असेल निवडणूक कार्यक्रम

कारखान्याच्या या निवडणुकीसाठी उद्या १० मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १० मार्च ते १७ मार्च ही अर्ज दाखलाची मुदत आहे. त्यानंतर १८ मार्चला या अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर १९ मार्चला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

२ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ३ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १७ एप्रिलला मतदान आणि १९ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

२१ संचालकांची निवड

कारखान्याचे एकूण २१ संचालक निवडण्यात येणार आहेत. त्यात जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम आणि रावगाव हे पाच ऊस उत्पादक गटातून प्रत्येकी ३ याप्रमाणे १५ संचालक निवडले जातील. तर सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्थायामधून एक, अनुसूचित जाती-जमातीत प्रवर्गातून एक, महिला राखीव गटातून दोन, इतर मागास प्रवर्ग एक आणि विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातून १ अशा २१ संचालकांची निवड होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT