sugar Commissioner agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Commissioner : साखर कारखाने १५ नोव्हेंबरपूर्वी सुरू केल्यास कारवाई, साखर आयुक्तांकडून परिपत्रक जारी

Maharashtra Sugar : राज्य शासनास प्राप्त झालेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र साखर कारखाने क्षेत्र आरक्षण आणि ऊस गाळप व पुरवठा विनियमन पारित केला आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Season : यंदाचा २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार जे साखर कारखाने गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपूर्वी सुरू करतील, अशा कारखान्यांच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी(ता.१५) दिला.

साखर आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये शासनाने ऊस नियंत्रण आदेश दिला आहे, त्यानुसार साखर कारखान्यांना गाळप परवाना घेतल्याशिवाय ऊस गाळप करता येणार नाही, अशी तरतूद आहे. राज्य शासनास प्राप्त झालेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र साखर कारखाने क्षेत्र आरक्षण आणि ऊस गाळप व पुरवठा विनियमन पारित केला आहे. यानुसार प्रत्येक साखर कारखान्यांना दरवर्षी ऊस गाळप करण्यापूर्वी गाळप परवाना घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामध्ये सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी संचालकांना सूचना जारी केल्या आहेत.

१५ नोव्हेंबरपूर्वी कोणत्याही परिस्थितीत ऊस गाळप सुरू करू नये. गाळप परवाना घेऊनच १५ नोव्हेंबरपासूनच ऊस गाळप सरू करावे; अन्यथा शासनाच्या निर्देशाचे उल्लंघन झाल्याचे गृहीत धरून गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे.

संबंधित जिल्ह्याचे पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांनाही कळविण्यात आले आहे की, प्रादेशिक साखर सहसंचालकांनी १५ नोव्हेंबरपूर्वी गाळप सुरू करणाऱ्या कारखाना अध्यक्ष व कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कळविण्यात आल्यानंतर आपण संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना सूचना द्याव्यात.

प्रादेशिक साखर सहसंचालकांवर जबाबदारी

संबंधित विभागाच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांनी १५ नोव्हेंबरपूर्वी ऊस गाळप सुरू करणाऱ्या साखर कारखाना अध्यक्ष, कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही साखर आयुक्तांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT