Kolhapur Milk News : कोल्हापूर जिल्ह्यात दुध संस्थांचे जाळे मोठे असल्याने २ हजारांहून अधिक दूध संस्था दूध संकलन करतात. दरम्यान दुग्ध विभागाने मागच्या दोन महिन्यांपूर्वी ५० लिटरपेक्षा कमी संकलन असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचा आदेश जारी केला होता. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १४५० दूध संस्थांना नोटीसा प्राप्त झाल्या आहेत.
यामुळे दूध संस्थांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आपली संस्था बंद होणार या भितीने काही संस्थाचालक यातून बचाव करण्यासाठी संस्था चालकांनी विविध क्लुप्त्या करत दूध संकलन वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
मागच्या काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचा पदभार हातात घेता धडक मोहिम राबवली आहे. मुंढे यांनी ५० लिटर दूध संकलन करणार्या संस्था बंदच करा, असे आदेश काढले आहेत. जर कार्यवाही झाली नाही तर अधिकार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिल्याने अधिकारी वर्ग चांगलाच कामाला लागला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजारापेक्षाही जास्त दूध संस्था आहेत. यातील जवळपास २ हजार संस्थांमध्ये ५० ते ७० लिटरच दूध संकलन होते. मिळालेल्या सर्व्हेनुसार कमी संकलन व बंद संस्था अवसायनात काढण्यासाठी दुग्ध विभागाचे तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत; पण हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया पुढे जात नसल्याचे चित्र आहे. आता कमी संकलन व बंद असणार्या १४५० दूध संस्था अवसायानात काढून त्या बंद करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम दुग्ध विभागाकडून सुरु आहे मिळत आहे.
दरम्यान आपल्या संस्थेवर कारवाई होऊ नये म्हणून ज्या दूध संस्थाकडे जास्त संकलन होते तिथले दूध खरेदी करत संस्थेच्या नावे संघाला पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी अशा पळवाटा काढल्या सजात आहेत.
५० लिटरच्यावर संकलन असणार्या काही दूध संस्थांनाही नोटिसा मिळाल्याची माहिती आहे. संस्थांची नोंदणी एका संघाकडे तर दूध मात्र दुसर्याचा संघाला, अशा संस्थांचा यात समावेश असल्याचे समजते. त्यामुळे संकलनात गोंधळ दिसत असल्याने त्या संस्थांना अवसायनाची नोटीस लागू झाली आहे. काही संस्था संघाचे सभासद कायम ठेवण्यासाठी १० ते २० लिटर दूध पुरवठा करून इतर दूध खासगी विक्री किंवा इतर संघांना पुरवठा करतात, अशा संस्थांनाही नोटीस मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.