milk rate : पशुसंवर्धन मंत्री विखेंच्या आश्वासनानंतर दूध उत्पादकांचं उपोषण मागे!

Team Agrowon

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादकांचे सुरू असलेले अन्न त्याग उपोषण ६ व्या दिवशी स्थगित करण्यात आले. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी फोन चर्चा केली.

Milk Production | Agrowon

तसेच दूध दर प्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी प्रतिनिधी सोबत बैठक घेऊ अशी आश्वासन डॉ. नवले यांना दिले.

AJit Navle | Agrowon

तसेच जनसंघर्ष संघटनेचे उपोषणकर्ते संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांना जिल्हाधिकाऱ्याने दूध दर प्रश्नावर बैठक घेतली जाईल, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी ६ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण स्थगित केले आहे.  

Kisan Sabha | Agrowon

दुधाला दर ३४ रुपये प्रतिलीटरचा दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी किसान सभा आणि जनसंघर्ष संघटनेकडून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अन्नत्याग उपोषण सुरू होते.

Milk Production | istock

तसेच किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दूध प्रश्नावर पशुसंवर्धन मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे सर्वांच्या सुचनांचा आदर करून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 

Milk | Agrowon

या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दूध दराकडे सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच डॉ. नवले आणि उपोषणकर्त्यांनी तब्येतीसाठी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.

sharad pawar | agrowon

यावेळी सरकारने दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशीही मागणीही किसान सभेने केली आहे. दूध पावडरचा साठा वाढत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात दुध पावडरचे दर कोसळल्याने निर्यात बंद झाली आहे. दूध दर कोसळण्याचे हे एक महत्वाचे कारण सांगितले जात आहे. याकडे सरकारचे लक्ष किसान सभेने वेधले आहे. 

Milk Rate | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
क्लिक करा