Agricultural Input Centers Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Input Centers : धाराशिव जिल्ह्यातील १९ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Kharif Season : खरीप हंगाम जवळ आलेला असताना खत, बी बियाणे व कीटकनाशके विक्रीमध्ये गडबड करणाऱ्या १९ कृषी सेवा केंद्रांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : खरीप हंगाम जवळ आलेला असताना खत, बी बियाणे व कीटकनाशके विक्रीमध्ये गडबड करणाऱ्या १९ कृषी सेवा केंद्रांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे. यात जिल्ह्यातील दोन कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, बारा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित व पाच केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी दिली. कृषी विभागाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तपासणीत ई-पॉस मशिनप्रमाणे : कृषी निविष्ठांचा साठ्यात तफावत आढळणे, परवान्यात समाविष्ट स्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टरला नोंद नसणे, विहित नमुन्यात पावती न देणे आदी अनियमितता आढळून आली आहे. यात १९ कृषी सेवा केंद्रांना देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या ३५ परवान्यांबाबत कारवाई केली आहे.

कळंब तालुक्यातील तीन व लोहारा तालुक्यातील तीन केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले. भूम तालुक्यातील १७, धाराशिव तालुक्यातील चार, तुळजापूर तालुक्यातील एक तर कळंबमधील दोन केंद्रांचे परवाने निलंबित केले. तर धाराशिव तालुक्यातील दोन, परंडा, तुळजापूर व वाशी तालुक्यांतील प्रत्येकी एका केंद्रचालकांना ताकीद दिली.

रोहन अॅग्रो सर्व्हिसेस (पाथ्रुड), आधार एंटरप्रायजेस अॅण्ड अॅग्रो कन्सल्टन्सी (धाराशिव), शेतकरी अॅग्रो एजन्सी (येडशी), महालक्ष्मी अॅग्रो एजन्सी (येडशी), दत्त कृषी सेवा केंद्र (इंदिरानगर, धाराशिव), तुळजाभवानी अॅग्रो एजन्सी (येरमाळा), कृषिधन अॅग्रो एजन्सीज (वाशी), तिरुमला कृषी सेवा केंद्र (येडशी), आलप्रभू कृषी सेवा केंद्र (भूम), प्रतिभा कृषी सेवा केंद्र (पाथ्रुड), साई अॅग्रो एजन्सीज (भूम), (सोन्नेवाडी), वैष्णवी कृषी सेवा केंद्र (दहिफळ), न्यू साईराज अॅग्रो एजन्सीज (परंडा), अनुजा कृषी सेवा केंद्र (पाथ्रुड), भोसले कृषी सेवा केंद्र (जळकोट), शुभम अॅग्रोवन मार्ट (लोहारा), अंजनी अॅग्रो एजन्सी (देवळाली) व जयकिसान कृषी सेवा केंद्र (तामलवाडी).

या कारवाईनंतरही कृषी सेवा केंद्राची तपासणी सुरूच राहणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी यांनी बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी परवानाधारक केंद्रातूनच करावी. पक्की पावती घेताना खरेदी निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. रायासनिक खतासाठी ई - पॉस मशीनवरील बिल घ्यावे. बियाणे खरेदी केल्यानंतर टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व अंतिम मुदत पाहून घ्यावी. काही तक्रार असल्यास ०२४७२ २२३७९४ वर संपर्क करावा तसेच याच क्रमांकावरील वॉटसअपवरही तक्रार करावी.
रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT