Election Commission of India Agrowon
ॲग्रो विशेष

Violation of Code of Conduct : आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारींवर कारवाई

Loksabha Election 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५०५ तक्रारींपैकी १ हजार ३२९ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे.

Team Agrowon

Pune News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५०५ तक्रारींपैकी १ हजार ३२९ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित १७६ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याद्वारे दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित आहे.

सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करू शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. अशा प्रकारे १५ मार्चपासून आतापर्यंत १ हजार ५०५ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १ हजार ३२९ तक्रारींवर कारवाई तर उर्वरित १७६ तक्रारी वगळण्यात आल्या.

प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी :

आंबेगाव विधानसभा २३ (१६), बारामती ५४ (३०), भोर ३ (२), भोसरी ४ (३), चिंचवड ३३ (२२), दौंड २८ (१९), हडपसर ४७ (४०), इंदापूर ४७ (४०), जुन्नर ३७ (३५), कसबापेठ २४७ (२२३), खडकवासला ७८ (७१), खेड आळंदी ३ (१), कोथरूड ४३ (३२), मावळ ४५ (३०), पर्वती २५८ (२५७), पिंपरी ११ (९), पुणे कॅन्टोन्मेंट १०९ (९१), पुरंदर ११ (८), शिरूर ३२ (१५), शिवाजीनगर ७१ (७०) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात ३२१ (३१५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT