Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Action : पुणे कृषी बाजार समितीतील डमी अडत्यांवर कारवाई

Pune APMC : डमी अडत्यांकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर बाजार समिती प्रशासन जागी झाली आहे. विविध गाळ्यांवर दोनपेक्षा अधिक डमी अडते आढळून आल्याने बाजार समिती प्रशासनाने गाळा मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे

Team Agrowon

Pune News : डमी अडत्यांकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर बाजार समिती प्रशासन जागी झाली आहे. विविध गाळ्यांवर दोनपेक्षा अधिक डमी अडते आढळून आल्याने बाजार समिती प्रशासनाने गाळा मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये ९ अडत्यांसह दोन संचालकांचा समावेश आहे. यांच्याकडून १९ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सचिव आर. एस. धोंडकर यांनी दिली.

पुणे बाजार समितीमधील फळे आणि भाजीपाला विभागात सातशेपेक्षा अधिक गाळे आहेत. या गाळ्यांवर मुख्य अडत्यासह दिवाणजी आणि एक मदतनीस यांना व्यापार करण्याची परवानगी बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

मात्र या परवानगीला केराची टोपली दाखवत अनेक अडत्यांनी गाळ्यावर डमी अडत्यांकडून बाजार मांडल्याचे चित्र आहे. यामध्ये एका गाळ्यावर पाच ते दहा डमी अडते विनापरवाना व्यापार करीत आहेत. यामधील अनेक गाळे डमी अडत्यांना बेकायदा दैनंदिन भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत.

या डमी अडत्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, दोन दिवसांपूर्वी मोसंबीला कमी दर देतो असे म्हटल्यावर चिडलेल्या डमी अडत्याने शेतकऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर बाजार समिती प्रशासनाने डमी अडत्यांवर कारवाई सुरू केली असून, मंगळवारी (ता.५) ९ अडत्यांवर कारवाई करत, १९ हजार ४७० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यामध्ये गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले या दोन संचालकांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT