सामंजस्य करार Agrowon
ॲग्रो विशेष

Akola News : अकोल्यात १,२३८ कोटींचे सामंजस्य करार गुंतवणूक परिषदेला प्रतिसाद

Agreement : येथे झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेत विविध ९५ उद्योग-व्यवसायांशी सामंजस्य करार करून जिल्ह्यात १ हजार २३८ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आहे.

Team Agrowon

Business : अकोला : येथे झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेत विविध ९५ उद्योग-व्यवसायांशी सामंजस्य करार करून जिल्ह्यात १ हजार २३८ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आहे. गुंतवणुकीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. याद्वारे जिल्ह्याचा भविष्यातील विकासाचा आशादायक आलेख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उद्योग सहसंचालक नीलेश निकम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, नगररचना सहायक संचालक सादिक अली, अकोला जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल आदी या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले, की राज्याच्या, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत २०२८ पर्यंत दुपटीने वाढ करण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा जीडीपी ३६ हजार कोटींचा आहे. तो वाढविण्यासाठी भक्कम सुविधांची आवश्यकता आहे. रेल्वे संपर्क, वैद्यकीय सुविधा ही जिल्ह्याची बलस्थाने आहेत.  

विमानतळ विकासासाठी आवश्यक भूसंपादन आदी प्रयत्न होत आहेत. एमआयडीसी विस्तारित जागेसाठी बोरगाव मंजू भागात पाहणी करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या सातकलमी कार्यक्रमानुसार गुंतवणूक प्रसार, इज ऑन लिव्हिंग या मुद्द्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

दोन हजारांहून अधिक तरुणांना रोजगार
परिषदेत ९५ उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार झाला. त्यामुळे सुमारे दोन हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. रिलायन्स सीएनजी प्लांटमधून १२० कोटींची गुंतवणूक होणार आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्याच्या विकासाला चालना देणे या हेतूने परिषदेचे आयोजन करण्यात आले, असे श्री. बनसोड यांनी सांगितले. या परिषदेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार व राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT