Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

Farmer Accident Grant Scheme : गेल्या वर्षभरात अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातासह विविध कारणांनी १४४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Amaravati News : गेल्या वर्षभरात अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातासह विविध कारणांनी १४४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे प्रत्येकी दोन लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.

या योजनेतील निकष बदलण्यात आल्यानंतर मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा विमा कंपनीच्या जाचक अटींतून मुक्तता होण्यासोबतच अनुदान मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे. तालुकास्तरीय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर दावे निकालात निघू लागली आहेत.

गेल्या वर्षभरात (२०२३-२४) कृषी विभागाकडे १०२ दावे दाखल झाले, तर चालू वर्षात १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत ६३ प्रकरणे आलीत. एकूण १६५ दाव्यांपैकी १४४ दावे मंजूर करण्यात आले आहेत. पाच दावे रद्द तर १३ दावे त्रुटीत काढण्यात आले. मृत्यू झालेल्या १४४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व दोन शेतकऱ्यांना अपघाताने कायम अपंगत्व आल्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

आतापर्यंत शासनाकडून १ कोटी ८७ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. याकरिता २ कोटी ९० लाखांची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत १ कोटी ८७ लाख रुपयांचे वितरण शेतकरी कुटुंबीयांना करण्यात आले आहे. १ कोटी ३ लाख रुपयांचा निधी शासनाकडून अप्राप्त आहे.

 निकष बदलल्याने लाभ वाढला

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या प्रकरणांत विमा कंपनी अनेक प्रकारच्या त्रुट्या काढून प्रकरणे प्रलंबित ठेवत होती. मंजुरीला विलबंही करीत होते. मात्र यावर आक्षेप आल्यानंतर या योजनेचे निकष बदलवून नामांतरही करण्यात आल्यानंतर लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, अशी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT