Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Agriculture Update : खरिपातील धूळवाफेवरील भातपिकाच्या मशागतीला गती आली आहे.

Team Agrowon

Sangli News : ‘रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ अशी बळिराजाची म्हण असून या अक्षय तृतीया आणि रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधण्यासाठी शिराळा तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागात खरिपातील धूळवाफेवरील भातपिकाच्या मशागतीला गती आली आहे. एकाच वेळी सर्वत्रच कामे सुरू झाल्याने शेतमजूर मिळविण्यासाठी आणि अधिकचा दर देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३ हजार ४१० हेक्टर असून त्यापैकी पिकाखालील क्षेत्र ३७ हजार ८५२ हेक्टर आहे. या भागातील बहुतांश शेतकरी खरिपातील धूळवाफेवरील भातपिकाची पेरणी पावसाच्या आधी करतात. त्यासाठी अक्षय तृतीया आणि रोहिणी या दोन मुहूर्तांच्या पार्श्‍वभूमीवर खरीप पेरणीपूर्व मशागतीला सध्या गती आली आहे.

शेतात खत ओढणे व पसरणे, बांध घालणे, नांगरणी व फणकटणी, पाटे मारणे व शेतातील सफाई काढणे आदी कामे गतीने सुरू आहेत. तापमानाचा पारा ४० अंशांवर असल्याने सकाळी सहा ते दहा व दुपारी चारनंतर शिवारे माणसांनी फुलून जात आहेत. तालुक्यात एकाही वळवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे मशागती खोळंबल्या आहेत. सध्या उपलब्ध बियाण्यांसाठी शेतकरी दुकानात चौकशी करत आहेत. ट्रॅक्टर व बैलजोडीच्या मशागतीचेही दर वाढले आहेत.

यंदा २९ हजार १३० हेक्टरमध्ये पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यामध्ये १३ हजार ६१३ हेक्टरमध्ये भात पेरणी होण्याची शक्यता आहे. २ हजार २०५ हेक्टरमध्ये ज्वारी, १ हजार २६२ मका, नाचणी, अन्य तृणधान्य, भुईमूग १ हजार १३३, सोयाबीन २ हजार ५०० आदी पिकांसह या पेरण्या होणार असल्याची शक्यता आहे.

सध्याचे मशागतीचे दर : (रुपयांत)

बैलजोडी प्रतिगुंठा १००

ट्रॅक्टर नांगरट, फणकटणी, रोटर मारणे, सरी सोडणे सरासरी प्रतिएकर ४ हजार

गावखताचे दर प्रतिट्रॉली २ हजार

ट्रॅक्टर भाडे ३०० ते ५००

भरणी ४००

पसरणी ४००

मजुरांचे दर २०० ते ३००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT