Ram Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation Work : कर्जत, जामखेडमधील जलसंधारण कामांना गती द्या ः प्रा. राम शिंदे

Water Management : शेती, पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी जलसंधारणाची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे कर्जत, जामखेड तालुक्यांत सुरू असणारे जलसंधारणाची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण व्हावीत.

Team Agrowon

Ahilyanagar News : शेती, पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी जलसंधारणाची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे कर्जत, जामखेड तालुक्यांत सुरू असणारे जलसंधारणाची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण व्हावीत. त्या दृष्टीने नियोजन करून कामाला गती द्यावी, असे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

कर्जत-जामखेड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मृद्‍ व जलसंधारण विभाग नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, मुख्य अभियंता एस. पी. कुशिरे यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी शिंदे म्हणाले, की जामखेड तालुक्यातील जवळा-बारव येथील साठवण तलाव योजनेची निविदा प्रक्रिया २८ फेब्रुवारीअखेर पूर्ण करावी, असे सांगत कर्जत तालुक्यातील येथील कामाचाही आढावा घेतला.

या वेळी एकूण १५१ कामांपैकी पूर्ण ६० आणि अन्य प्रगतिपथावरील ४५ कामांबाबत आणि जलसंधारण मंडळ, जलयुक्त शिवार अभियान २.०, अटल भूजल योजना, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, धरण व गाळमुक्त शिवार योजना आदी बाबींचा आढावा घेतला.

शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने जलसंधारणाची कामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत ज्या भागात जलसंधारणाची कामे झाली तेथे पाणी उपलब्धतेचे प्रमाण वाढले. आगामी काळात दोन्ही तालुक्यांत सुरू असलेली कामे यंदा वेळेत पूर्ण होतील त्या दृष्टीने नियोजन करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT