Gatha Punaruthhan Din  Agrowon
ॲग्रो विशेष

Sant Tukaram : गाथेतील अभंग समाजाला तारून नेत आहेत

Tukaram Gatha : संत तुकोबांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविण्यात आली. इंद्रायणीच्या डोहा काठी संत तुकाराम महाराजांनी तेरा दिवस अनुष्ठान केले.

Team Agrowon

Pune News : ‘‘जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथा इंद्रायणी नदीत तरल्या. या गाथेतील अभंग हे समाजाला तारून नेत आहेत. संतांचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजे,’’ असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी गुरुवारी (ता. ११) देहू येथे केले.

संत तुकोबांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविण्यात आली. इंद्रायणीच्या डोहा काठी संत तुकाराम महाराजांनी तेरा दिवस अनुष्ठान केले. चौदाव्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेला गाथा आहे, तशा तरंगुण वर आल्या.

या दिवसाचे औचित्य साधत गाथा परिवाराच्या वतीने देहूतील इंद्रायणीच्या डोहा काठी गाथा पुनरुत्थान दिवस गुरुवारी (ता.११) साजरा केला. त्या वेळी पुरुषोत्तम महाराज मोरे बोलत होते.

याप्रसंगी गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील, आळंदी येथील तुकाराम महाराज घाडगे, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, नगराध्यक्षा पूजा दिवटे, मधुकर कंद, प्रभाकर भोसले, ममता झांजुर्णे, गीतांजली देवाळकर, रवींद्र कंद, अभिजित घोरपडे उपस्थित होते.

परिवाराच्या वतीने इंद्रायणीच्या डोहात उभे राहून एकशे पंचवीस अभंगाचे वाचन तुकाराम महाराज घाडगे यांनी केले. सामुदायिक गाथा वाचनामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. गाथा वाचनानंतर प्रसिद्ध चित्रकार भास्कर हांडे व्याख्यान झाले.

गाथा पुनरुत्थान दिनानिमित्त संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथेचे पूजन देऊळवाड्यात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्‍वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पैठण येथील कीर्तनकार भास्कर महाराज बारे यांचे ‘तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम’ या अभंगावर कीर्तन झाले. संस्थानच्या वतीने कीर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT