Protest For Water Agrowon
ॲग्रो विशेष

Protest For Water : वाल्हे येथे पाण्यासाठी ‘आप’चे उपोषण

Water Crisis : पुरंदर तालुक्यामध्ये पाऊस कमी झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने शासनाने तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी यादीत समावेश केला आहे.

Team Agrowon

Pune News : पुरंदर तालुक्यामध्ये पाऊस कमी झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने शासनाने तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी यादीत समावेश केला आहे. यासंदर्भात शासनाकडून तीन महिने आधी शासन निर्णय निघूनसुद्धा दुष्काळी स्थितीमध्ये उपाययोजनेबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुरंदर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने वाल्हे (ता. पुरंदर) येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असल्याचे माहिती ‘आप’चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड यांनी दिली.

पुरंदर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. चारा व पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत चारा डेपो त्वरित सुरू करावेत, पीककर्जावरील व्याज माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करुन त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे व दुष्काळ संदर्भातील शासन निर्णयाची एकवीस दिवसांपर्यंत तो लागू होण्यासंदर्भात कायदा सरकारने करावा.

या मागण्यांसाठी बुधवारी (ता. ३१) ‘आप’च्या वतीने वाल्हे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरा शेजारी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. साखळी उपोषणामध्ये तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड, महेश जेधे, संदीप चौंडकर, अमोल कड, माणिक महाराज पवार, माजी सरपंच चंद्रकांत भुजबळ, विठ्ठल पवार, संपत भुजबळ, अरविंद पवार, दादासो पवार, ज्ञानदेव पवार आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. या मागण्या सरकार दरबारी पोहोचविण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी प्रा. संतोष नवले, सरपंच अतुल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, दादासाहेब मदने आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाला तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी, नागरिक भेट देऊन पाठिंबा देत आहेत. जोपर्यंत शासन दुष्काळी उपाययोजना प्रभावीपणे सुरू करीत नाही तोपर्यंत हे बेमुदत साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचे राजन पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT