Agricultural Mechanization
Agricultural Mechanization Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Mechanization : चिभड जमिनीची सुधारणा करण्यासाठी ट्रॅक्टरचलित सब-सॉयलर यंत्राचा वापर करावा

Team Agrowon

Beed News : चुकीच्या मशागत पद्धतीमुळे जमिनीत सहा इंच खोलीवर कडक थर तयार होत आहे. त्यामुळे जमिनी खराब होत आहेत.अशा चिभड जमिनीची सुधारणा करण्यासाठी ट्रॅक्टरचलित सब-सॉयलर यंत्राचा वापर करावा, असा सल्ला तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापक विनोद स्वामी यांनी दिला.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबा यांच्या माध्यमातून राजेवाडी (ता. अंबाजोगाई) येथे शेतकरी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय हवामान संवेदनशील कृषी नवकल्पना प्रकल्प (निकरा) अंतर्गत ग्राम समितीचे अध्यक्ष भास्कर काशीद, विनोद स्वामी, संदीप निकम व केंद्राचे कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांची उपस्थिती होती.

सब-सॉयलर यंत्र ४५ हॉर्सपॉवर क्षमतेच्या पुढील ट्रॅक्टरसाठी योग्य असून जमिनीत दीड ते अडीच फूट खोल जमीन फाडते व जमीन मोकळी, भुसभुशीत करते. योग्य मशागतीमुळे पिकाची वाढ व उत्पादन भरघोस आढळते, असे स्वामी यांनी सांगितले.

कृषी अभियंता रेणापूरकर म्हणाले, की प्रत्येक गावामध्ये अवजारे सेवा केंद्र स्थापने आवश्यक असून यामध्ये शेतकऱ्यांकरिता पीक पद्धतीनुसार गरजेची सर्व आधुनिक अवजारे असणे जरुरीचे आहे.

यामधील अवजारांचा भाडेतत्त्वावर अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना पुरवठा केल्यास शेतीमधील कामे वेळेवर पूर्ण करण्यास मदत होईल. कृषी यांत्रिकीकरणामुळे वेळेची बचत होऊन कमी कष्टात अधिक उत्पादन वाढ लाभदायक ठरेल.

केंद्राच्या माध्यमातून गावांमध्ये अवजारे सेवा केंद्र स्थापन केले असून पेरणीपूर्व जमिनीच्या मशागतीसाठी, रानबांधणीसाठी तसेच पेरणीसाठी आवश्यक आधुनिक अवजारे यांचा समावेश आहे. या सुविधेचा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणपश्चात शेतकऱ्यांना अवजारांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन बालाजी बोबडे (निकरा प्रकल्प-वरिष्ठ सहसंशोधक) यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT