PM Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : चार हजार कोटींच्या मदतीमुळे रब्बी निविष्ठा खरेदीला आधार

Farmers Agriculture Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान’ व ‘नमो’ योजनेचे मिळून एकूण ४००० कोटी रुपये उपलब्ध होत आहेत.

Team Agrowon

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान’ व ‘नमो’ योजनेचे मिळून एकूण ४००० कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. त्याचा वापर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या निविष्ठांची खरेदी करण्याकरिता होऊ शकतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

पंतप्रधान आज (ता.५) वाशीम येथे येत आहेत. त्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ तसेच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तील मदतीच्या हप्त्याचे ऑनलाइन वाटप होत आहे. ‘पीएम किसान’ योजना २०१९ मध्ये सुरू झाली. त्यातून प्रतिहप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होतात. यामुळे राज्यातील १.२० कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या १७ हप्त्यांमधून ३२०० कोटी रुपये मिळालेले आहेत.

‘पीएम किसान’ला समांतर ठरणारी ‘नमो’ योजना राज्यातील युती सरकारने आणली आहे. ‘पीएम किसान’च्या चौदावा हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी ‘नमो’चाही लाभ देण्यात येत आहे. राज्य शासनाने २०२३-२४ ते २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण ९१.४५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ दिला आहे. आतापर्यंत सहा हजार ९४९ कोटी रुपये ‘नमो’तून वाटले गेले आहेत.

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, ‘पीएम किसान’चा १८ हप्ता देताना केंद्राने काही निकष लावलेले आहेत. त्यानुसार भूमी अभिलेखाच्या अद्ययावत नोंद असलेले, बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असलेले व ई-केवायसी बंधनकारक आहे. तीनही अटी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्याच बॅंक खात्यात अठरावा हप्ता जमा होईल. राज्यात सध्या असे ९१.५२ लाख शेतकरी आहेत. त्यांच्या खात्यात किमान १८०० कोटी रुपये जमा होतील.

‘पीएम किसान’चा निधी देतानाच ‘नमो’चा पाचवा हप्तादेखील मिळणार आहे. त्यामुळे एकूण चार हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. एकत्रित रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९० लाखांच्या पुढे आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे १९०० कोटी रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून २१०० कोटी रुपये असा एकूण ४००० कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. या रकमेची मदत शेतकऱ्यांना रब्बी निविष्ठा खरेदीसाठी होणार आहे.
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT