Nutrient  Agrowon
ॲग्रो विशेष

Nutrient Management : अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याची सोपी पद्धत

Team Agrowon

डॉ.एस.एन.पोतकिले, डॉ.एकता बागडे

Chemical fertilizers Update : रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खते देण्याची योग्य पद्धत, वेळ, ठिकाण व त्याची योग्य मात्रा यांचा विचार करणे आवश्यक आहे. खतांचा कार्यक्षम वापर व संतुलित मात्रेचा विचार करताना पिकांच्या मुळांची रचना व गुणधर्म कशी आहे.

वाढीच्या कोणत्या कालावधीत कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात शोषून घेतात, जमिनीत अन्नद्रव्यांची हालचाल कशी होते त्यानुसार खते कुठे द्यावीत, त्या संबधित निर्णय घ्यावे लागतात.

कोणतेही रासायनिक खत पिकांना देताना वाण, कालावधी, जमिनीतील ओलावा, तापमान, एकरी रोपांची संख्या, अपेक्षित उत्पन, किडी व रोग व अन्नद्रव्यांची पातळी या बाबींचा विचार करावा. असे केल्यास खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अपेक्षित उत्पन मिळेल. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद, आणि पालाश याच्या वापराचे प्रमाण ४:२:१ असावे.

१) पिकाची उत्पादकता कमी झालेली किंवा स्थिरावलेली दिसून येते. त्याचप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा व पिकाद्वारे होणारे अन्नद्रव्यांचे शोषण यामधील तफावत वाढत चाललेली आहे.

२) मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांबरोबरच दिवसेंदिवस जमिनीत व पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येत आहे.

३) शाश्वत उत्पादनासाठी पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे महत्त्वाचे आहे. पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना पिकांचे संतुलित पोषण झाले पाहिजे. अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करावा.

या पद्धतीने अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकांना आवश्यक सर्वच मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्याचा संतुलित पुरवठा होतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यास व टिकून ठेवण्यास मदत होते. एखाद्या अन्नद्रव्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी झाले तर पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो.

४) अनियंत्रित पद्धतीने रासायनिक खतांचा जास्त वापर केल्याने जमिनीची सुपीकता खालवत चाललेली आहे. असे दिसून येते की गंधक, जस्त, लोह व बोरॉन इत्यादी अन्नद्रव्यांची कमतरता वाढत चाललेली आहे.

पिकांना जास्त प्रमाणात नत्र, स्फुरद, आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये खतामधून दिली जातात परंतु दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जात नाही. त्याचा परिणाम पीक उत्पादन आणि गुणवत्तेवर होताना दिसतो.

संतुलित पीक पोषणासाठी :

१. स्फुरद, पालाश न वापरता फक्त नत्रयुक्त खतांचा वापर करणे धोकादायक आहे.

२. जमिनीत कमतरता असल्यास मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक, जस्त, लोह, बोरॉन यांचा वापर करणे आवश्यक आहे.

३. एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता इतर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी करू शकते.

४. जास्त प्रमाणात वापर असंतूलन वाढविते, अन्नद्रव्यांचे जास्तीचे शोषण होते.

५. पाण्याची कार्यक्षमता संतुलित खत वापर वाढविते.

संतुलित खत वापरताना:

१. संतुलित खत वापरल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

२. उत्पादनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारते.

३. जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता कमी होण्यास मदत होते.

४. जमिनीची सुपीकता टिकून राहते.

खतांची कार्यश्रमता वाढविण्यासाठी उपाययोजना :

१. खतांचा वेळेवर व संतुलित वापर.

२. जमिनीत जीवाणू खते, सेंद्रेय खते, हिरवळीची खते आणि पेंडीचा वापर करावा.

३. माती परीक्षणानुसार खतांचा वापर.

४. नत्रयुक्त खताची मात्रा पीक शिफारशीनुसार विभागून द्यावी.

५. पिकांच्या मुळाजवळ स्फुरदयुक्त खताचा वापर करावा. स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू खताचा वापर करावा.

६. दोन चाड्याच्या पाभरीने खत व बियाणे पेरणी करावी.

७. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जमिनीतून किंवा फवारणीद्वारे वापर केल्यास इतर खतांची कार्यक्षमता वाढते.

८. ठिबक सिंचनातून खते दिल्यास २५ टक्के खतांची बचत होते, मुळाजवळ दिली जात असल्याने व निचराद्वारे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होऊन खतांचा कार्यक्षम वापर होतो.

९. सिंचनाची योग्य पद्धत व वेळ, तणाचा, किडी व रोगांचा बंदोबस्त यामुळे खतांचा योग्य वापर होतो.

१०. जमिनीत ओलावा असणे खतांच्या कार्यक्षम वापरासाठी आवश्यक आहे.

संपर्क - डॉ.एस.एन.पोतकिले,९४२२२८४८३४, (प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोल,जि.नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT