Chana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : हरभऱ्याच्या दहा एकर पिकावर फिरविला नांगर

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभऱ्यावर किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक पिवळे पडून सुकले.

Team Agrowon

Yavatmal News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी हंगामात लागवड केलेल्या हरभऱ्यावर किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक पिवळे पडून सुकले. परिणामी हवालदील झालेल्या कवठा येथील गोपाल गुड्डलवार या शेतकऱ्याने दहा एकर शिवारावर नांगर फिरविल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

अतिवृष्टी, संततधार पाऊस, गारपीट अशा आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना खरीप हंगामात करावा लागला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची उत्पादकता प्रभावित झाली. तूर, कपाशी, सोयाबीन या खरीप पिकांचा हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा लागून होत्या.

जमिनीत ओलावा असल्याने रब्बी हंगाम लाभदायी ठरेल, असे वाटत असतानाच पुन्हा बरसलेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक ठरेलस असा दावा कृषी विभागाकडून केला जात होता. मात्र झाले भलतेच २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत बरसलेल्या पावसाने रब्बी पिकांवर किडरोगाचा प्रादुर्भाव झाला.

हरभरा पीक पिवळे पडून करपले. परिणामी त्यातून हाती काहीच लागणार नाही याची जाणीव झाल्याने कवठा येथील गोपाल गुड्डलवार या शेतकऱ्याने बैलजोडी जुंपत नांगराच्या साहाय्याने दहा एकरातील हरभरा पीक काढून टाकले.

दहा एकरात त्यांना सहा क्‍विंटल बियाणे लागले. निंदणी, फवारणी, सिंचन अशा कामांवर एक लाखाच्या आसपास खर्च झाला. परंतु पीक करपल्याने हा खर्च वाया गेला आहे. गोपाल यांच्याप्रमाणेच आर्णी तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक काढले असून दुबार पेरणी केली आहे. दुसरीकडे शासनाकडून सातत्याने आलेल्या नैसर्गिक आपत्ती काळात भरपाईची घोषणा करण्यात आली. परंतू एकदाही मदतीची रक्‍कम खात्यात जमा झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढले आहे.

महिनाभरापूर्वी हरभरा पेरणी केली होती. बि-बियाणे, निंदणी, फवारणी, सिंचन, मशागत असा एक लाख २० हजार रुपयांचा खर्च झाला. आता पीक पिवळे पडून करपले. परिणामी ते काढण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता दुबार पेरणीसाठी पैशाची तजवीज करण्याचे आव्हान आहे.
गोपाल गुड्डलवार,शेतकरी, कवठा, आर्णी
हरभरा पीक पिवळे पडून करपत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडून पिक वाचविण्यासाठी जैविक तसेच रासायनिक निविष्ठांची मागणी सर्वाधीक आहे.
हाजी आरीफ पठाण, कृषी सेवा केंद्र संचालक, आर्णी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT