Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : शेतकऱ्याचा प्रामाणिकतेचा आदर्श ; पीकविम्याची चुकून जमा झालेली रक्कम परत केली

Crop Insurance Scheme : सध्याच्या डिजिटल युगात अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या बातम्या दर दिवशी ऐकायला मिळतात;परंतु अशा परिस्थितीतही काही व्यक्ती या गोष्टीला अपवाद आहेत.

Team Agrowon

Nashik News : सध्याच्या डिजिटल युगात अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या बातम्या दर दिवशी ऐकायला मिळतात;परंतु अशा परिस्थितीतही काही व्यक्ती या गोष्टीला अपवाद आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सायगाव(ता. येवला) येथील शेतकरी गंगाधर सखाहरी कुळधर यांचे बॅंक तपशील चुकले. हे पैसे आडगाव चोथवा (ता. येवला) बाळासाहेब खोकले यांच्या खात्यावर ४३ हजार रुपये जमा झाले होते.

अखेर पडताळणी झाली असता, त्यांनी प्रामाणिकपणे ४३ हजार रुपयांची रक्कम परत केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक रुपयात पीक विमा काढून सहभाग नोंदविला. त्यात येवल्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला. सायगाव येथील शेतकरी गंगाधर सखाहरी कुळधर यांचे बॅंक तपशील चुकले.

ही गोष्ट पीक विमा रक्कम जमा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. त्यांनी येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पीक विमा कंपनी प्रतिनिधी बाजीराव पाचपुते यांच्याकडे संपर्क साधला. तपासणी नंतर चुकलेला खाते नंबर हा आडगाव चोथवा येथील बाळासाहेब काशिनाथ खोकले यांचा असल्याचे समोर आले.

त्यावेळी तालुका पीकविमा कंपनी प्रतिनिधी श्री. पाचपुते, कृषी सहाय्यक सोनाली कदम यांनी संबंधित शेतकरी श्री.खोकले यांना संपर्क साधला. मात्र ते तीर्थयात्रेनिमित्त बाहेरगावी होते.

त्यांना आपल्या बॅंक खात्यात जमा झालेली रक्कम आपली नसून दुसऱ्या शेतकऱ्याची आहे हे समजताच तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला येथे येऊन त्यांनी रक्कम परत करण्याची तयारी दाखवली.यात्रेवरून आल्यावर त्यांनी श्री. कुळधर यांना ४३ हजार रुपये ऑनलाइन जमा केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT