Papaya  Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation : पपई खालील मोठे क्षेत्र खानदेशात रिकामे

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपई पीक परवडत नसल्याने मोठे क्षेत्र रिकामे झाले आहे. अनेकांनी कमी दर व उष्णतेमुळे मागील महिन्यात क्षेत्र रिकामे केले असून, त्यात कापूस लागवड करण्यात आली आहे.

पपईची खानदेशात सर्वाधिक सुमारे ५२०० हेक्टर एवढी लागवड नंदुरबारात २०२३-२४ च्या हंगामात झाली होती. त्यापाठोपाठ जळगावात सुमारे १२०० हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे एक हजार हेक्टरवर पपईची लागवड होती. मागील वर्षी रोपे वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची लागवड उशिरा किंवा एप्रिल, मे महिन्यात झाली. ज्यांनी जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रातून काढणी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सुरू झाली.

परंतु उशिरा लागवडीच्या बागांमध्ये डिसेंबरमध्ये काढणी सुरू झाली. पपईचे दर ऑक्टोबरमध्ये ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो, असे शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदीत मिळत होते. नोव्हेंबरमध्ये दर सरासरी २० रुपये प्रतिकिलो, असे मिळाले. डिसेंबरमध्ये सरासरी दर सहा रुपये प्रतिकिलो, असे होते. डिसेंबरमध्ये दर ११, नऊ, आठ, सात व शेवटी चार रुपये प्रतिकिलो, असे झाले.

या महिन्यातही सुरवातीपासून प्रतिकिलो चार, तीन, अडीच रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना थेट खरेदीत मिळत आहे. दर कमी असतानाच काही शेतकऱ्यांच्या बागांत रोगराई वाढली. यामुळे उत्पादन घटले. तर अनेकांना कमी दर व काढणी खरेदीदार करीत नसल्यान्याने फटका बसला. पीक परवडत नसल्याने ते शेतकऱ्यांनी काढून फेकले. त्यात मे व या महिन्यातील उष्णता, कमी दर यामुळेदेखील क्षेत्र रिकामे करण्याची कार्यवाही झाली आहे.

३००० हेक्टरवरील पपई पीक काढल्याचा अंदाज...

खानदेशात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवरील पपईचे पीक एप्रिल, मे व या महिन्यात शेतकऱ्यांनी काढले आहे. त्यात बाजरी, कांदा यांची लागवड केली आहे. तर पपईचे बेवड केळीसाठी अनुकूल असल्याने अनेकांनी मार्च, एप्रिलमध्ये त्यात केळी लागवडीचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांनी पीक काढल्याची माहिती आहे. पपईची मागणी हिवाळ्यात अधिक असते. परंतु यंदा हिवाळ्यातही मागणी कमी राहिल्याने दर कमी होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT