Marriage Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer's Daughter Marriage : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीचा लावला विवाह

Suicide Farmer Family Girl Marriage : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचा विवाह लावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Team Agrowon

Akola News : विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आबाळ होते हेही अनेक कुटुंबांच्या उदाहरणातून स्पष्ट झालेले आहे. अशाच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचा विवाह लावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

हा विवाह सोहळा नुकताच बाळापूर तालुक्यातील शेळद फाटा येथे असलेल्या मराठा हॉटेलच्या लॉनवर पार पडला. या हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी विवाहासाठी खास पुढाकार घेतला. वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलीच्या विवाहात लोकसहभागातून सर्व व्यवस्था करण्यात आली.

कन्यादान हा कुठल्याही बापाच्या आयुष्यातील भावनिक प्रसंग असतो. मात्र नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले, त्या मुलींच ही वेदना अधिक जाणू शकतात. बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथील शेजल हिचे पितृछत्र हरवले आहे.

तिचे वडील राजेश वानखडे यांचा मृत्यू झालेला असल्याने शेजल मोठी झाल्यानंतर तिच्या मामांनी तिच्या लग्नासाठी वर संशोधन सुरू केले होते. खापरखेड (ता. तेल्हारा) येथील कै. रामेश्‍वर पोटे यांचा मुलगा प्रवीण याचे स्थळ तिच्यासाठी आले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर तिचा विवाह मराठा हॉटेलच्या लॉनवर उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात अनिरुद्ध बक्षी, पी. टी. पाटील, वैभव फरतारे, अनिल जुमळे, बंडूनाना पजई, सय्यद ऐहसोद्दीन, गोपाल झुणझुनवाला, भाऊसाहेब शिंदे अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कन्यादान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी केले.

त्यांनी वधू पित्याची भूमिका बजावत कन्यादान करून वधूला आजीवन पाठबळ देण्याचे वचन दिले. या विवाह सोहळ्यासाठी रमेश ठाकरे, विजय वाघ, पुरषोत्तम मांगटे पाटील, माधव घोगरे, जगदीश पाटील, नीलेश हाडोळे, सुधीर कांबेकर, श्रीकृष्ण इंगळे, मधुकर लांडे, माऊली शिवलकर, राजू हिवरकर, जढाळ महाराज, वासुदेव इंगळे यांनी पुढाकार घेतला.

यांनी दिले सहकार्य

लग्न सोहळ्यासाठी लोकसहभागातून मुरलीधर राऊत यांच्या पुढाकाराने लॉन, जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तर मंडप डेकोरेशन अमोल जामोदे, फोटो, व्हिडिओ महेश आंबेकर, लग्नपत्रिका श्रीकांत धनोकार, फेटे माउली शिवलकर, नवरीचे मेकअप पद्मजा मानकर, इव्हेंट शुभम धनोकार यांनी सांभाळला. उपस्थितांना जेवण, सर्व सुविधा सेवाभावाने देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT