Go Shala Agrowon
ॲग्रो विशेष

Go Shala : कणेरीत देशभरातील गो-वंशांचा मेळा

देशभरातील देशी गायीं, बैल प्रदर्शनात आणल्या आहेत. विविध आकाराच्या, विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या देशी गाई, रुबाबदार बैल, नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : विविध जातींच्या गायींसह, दिमाखदार बैलांचे अनोखे प्रदर्शन कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठाच्या वतीने आयोजित सुमंगल लोकोत्सवात भरवण्यात आले आहे.

देशभरातील देशी गायीं, बैल प्रदर्शनात आणल्या आहेत. विविध आकाराच्या, विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या देशी गाई, रुबाबदार बैल, नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत.

खिलार, देवणी, लाल कंधारी, गीर, कुंगनूर कोकणगीड वेचुर, कांगायम, राठी, ओंगल, कांकरेज, बारगुर अमृत महल, थारपारकर, साहिवाल यांच्यासह अन्य देशी प्रजातींच्या गायी येथे पाहायला मिळत आहेत.

म्हशींच्याही अनेक देशी प्रजाती येथे आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी आणि जाफराबादी यांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या बैल जोड्या आणि हलगीच्या कडकडाटात बैल जोड्यांचे होणारे स्वागत प्रदर्शनात रंग भरत आहे.

सेंद्रिय शेती करताना देशी गाय ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. याचबरोबर आरोग्यदायी घटकांनी युक्त असलेली पंचगवये भविष्यात आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

दरम्यान, याचा विचार करून देशभरातील विविध दुर्मिळ जातींच्या देशी गाईचे प्रदर्शन या लोकोत्सवात भरविण्यात आले आहे. प्रत्येक गायीपुढे त्याच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली आहे.

पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतुने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व पशू संवर्धन विभागातर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT