Swabhimani Shetkari Sangathan Agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Shetkari Sangathan : बुलढाण्यात स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाचा तुफान राडा; चार ते पाचजण गंभीर जखमी

Dnyaneshwar Tale Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव येथे तुफान राडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा राडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि इतर १० ते १२ जनांनी केला असून यात चार ते पाच जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे जिल्हाध्यक्षासह १० ते १२ जनांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने तुफान राडा केला. ज्यात चार ते पाच जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह हैदोस घालणाऱ्या १० ते १२ जनांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलढाण्यातील डोनगाव येथे जागेच्या जुन्या वादातुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे कारण हे गजानन सातपुते यांच्या ताब्यात असलेल्या दुकान असल्याचे बोलले जात आहे.

या दुकानाचा ताबा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह १० ते १२ जनांनी बळजबरीने दुकानात प्रवेश केला. यातूनच हा राडा झाला. यावेळी तेथे असणाऱ्या महिलांना सुद्धा मारहान झाल्याने समोर आले आहे.

तसेच या हाणामारीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह १० ते १२ जनांनी दुकानात घुसून गजानन सातपुते यांच्यासह इतरांवर हल्ला केला. ज्यात कोयत्याचा वापर करण्यात आला. यामुळे ज्ञानेश्वर टाले यांच्यासह इतर चार ते पाच जन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याची डोनगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

याप्रकरणी डोनगाव पोलिसांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हे नोंद दाखल केले आहेत. तर ज्ञानेश्वर टाले यांनी देखील उलट तक्रार दाखल केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT