Fodder Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

Rain Update : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात चांगलाच दणका दिला आहे. रविवारी (ता. १२) चौथ्या दिवशीही सकाळी अकरा वाजल्यापासून पावसाने सुरवात केली होती.

Team Agrowon

Pune News : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात चांगलाच दणका दिला आहे. रविवारी (ता. १२) चौथ्या दिवशीही सकाळी अकरा वाजल्यापासून पावसाने सुरवात केली होती. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला. अनेकांची कडब्याची गंज उडून गेल्याने, भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जवळपास नऊ मेपासून पावसास सुरवात झाली आहे. पहिल्या दोन दिवस कमी-अधिक अनेक ठिकाणी पाऊस पडला. तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर अधिक होता. तर, चौथ्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण होते. वाघोली, खराडी, चंदनगरसह अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हवेली, पुरंदर, भोर, मुळशी भागात शनिवार (ता. ११) अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांची कडब्याची गंज उडून मोठे आर्थिक नुकसान झाले. अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने अनेकांच्या कडब्याच्या गंजी भिजल्या.

पावसाळा सुरू होण्यासाठी अगदीच काही दिवसच शिल्लक राहिल्याने मशागतीची कामे युद्ध पातळीवर करून घेतली जातात. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र, उन्हाळी पाऊस पडला नसल्याने काही कामे खोळंबली आहेत. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत विविध ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या.

त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची तयारी करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुरंदरमधील वाल्हे, आडाचीवाडी, पातरमळा, सुकलवाडी, चाहूर वस्ती परिसरात विद्युत वितरण कंपनीचे खांब पडून विद्युत तारा तुटल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला.

फळबागांचे नुकसान

या वादळी वाऱ्यासह पावसाने, अंजीर, सीताफळ, पेरू, डाळिंबाचे व इतर बागांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही झाडे मोडून पडली.

वादळी वारे जोरदार असल्याने अनेक घरावरचे, तसेच गोठ्याचे पत्रे उडाल्याने त्याचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT