MLA Babanrao Lonikar Agrowon
ॲग्रो विशेष

MLA Babanrao Lonikar: लोणीकर यांच्यावर टीकेची झोड

Controversial Statement: भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रमुख विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

रमेश जाधव

Jalna News: भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रमुख विरोधी पक्ष व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. लोणीकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून त्याबद्दल त्यांना समज देण्यात येईल, असा जाहीर खुलासा करावा लागला.

परतुर तालुक्यातील वाटूर येथे बुधवारी (ता. २५) घरकुलासाठी वाळूचे पासवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहिणाऱ्यांवर टीका करताना आमदार लोणीकर यांची जीभ घसरली. ते म्हणाले, ‘‘पारावर बसणारे रिकामचोट तरुण लिहितात की मोदींनी काय दिले? फडणवीसांनी काय दिले? आणि आमदाराने काय दिले? कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे...

त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदींनी सहा हजार दिले. तुझ्या बायकोला, मायच्या, बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरील कपडे आमच्या सरकारचे. तुझ्या पायातील बुट-चप्पल आमच्यामुळे, तुझ्या हातातील मोबाइलच डबडं आमच्यामुळे, आमचेच पैसे घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का?’’

या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आमदार लोणीकर यांचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, रविकांत तुपकर आदींनी त्यांचा तिखट शब्दांत समाचार घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस यांना अखेर या प्रकरणी सारवासारव करावी लागली. ते म्हणाले, ‘‘बबनराव लोणीकर यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. काही लोकांना उद्देशून असे विधान केले असले तरी ते चुकीचे आहे. असे विधान करायचा अधिकार कोणालाही नाही. आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत. आम्हाला मालक बनता येणार नाही. लोणीकर यांना समज देण्यात येईल.’’

मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आ. लोणीकर यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकार परिषद घेत माफी मागितली. आपण हे विधान स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले होते. मी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. मी शेतकऱ्यांमुळेच आहे. त्यांची मी शंभर वेळा माफी मागेन, असे ते म्हणाले.

आमदार लोणीकर यांना सत्तेचा माज आलेला आहे. तुमच्या गावात येतो. त्या ठिकाणच्या पारावर बसून आपण हिशेब करू. सोयाबीनला ८ ते ९ हजार रुपये दर मिळणे आवश्यक असताना तुटपुंजा दर मिळतो आहे. एकट्या सोयाबीन पिकात शेतकऱ्यांचे ३५ ते ४० हजार कोटींचे नुकसान झाले. ४०० रुपयांना मिळाणारे डीएपी खत १३५० रुपयांना मिळत आहे. याचाही हिशेब करू.
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT