Boring Wells  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : विंधन विहिरीसाठी ९५० प्रस्ताव दाखल

Boring Wells : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक लाभाच्या महत्वपूर्ण योजनेचा फायदा होत आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : अवर्षणस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ओलिताखालील शेतीसाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समितीकडे विंधन विहिसाठी प्राप्त झालेल्या ९५० प्रस्तावापैकी १८७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक लाभाच्या महत्वपूर्ण योजनेचा फायदा होत आहे. मात्र त्यासाठी करावी लागणारी पायपीठ, मानसिक व आर्थिक झटका देणारी ठरत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.

उमरगा पंचायत समितीत प्रशासकाचा कार्यकाळ सुरु झाल्यापासून कामात पारदर्शकता दिसून येत नाही. सिंचन विहिरी, शेवगा लागवड, जनावरांचा गोठा या वैयक्तिक लाभाच्या प्रस्तावावरील धुळ तत्कालीन प्रशासकाच्या कार्यकाळात बाजुला केलीजात नव्हती.

मात्र शेवटच्या टप्प्यात काही मोजक्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. नव्याने रूजू झालेले गटविकास अधिकारी तथा प्रशासक प्रशांतसिंह मरोड यांनी रुजू झाल्यानंतर जून २०२३ मध्ये ‘पेन्डन्सी’ प्रस्तावाचा निपटारा सुरू केल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यानंतरही वैयक्तिक लाभाच्या प्रस्ताव मंजुरीचे काम सुरू आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू असला तरी त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे. सध्या पंचायत समितीत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकिय स्ततरावर प्रस्ताव मंजुरीसाठी लाभार्थ्यांना पायपीठ करावी लागत आहे. काही दिवसात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने प्रशासकाकडून प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी गती मिळायला हवी.
- मदन पाटील, माजी सभापती, पं. स. उमरगा
पदभार घेतल्यापासुन वैयक्तिक लाभाचे पात्र प्रस्ताव मंजुरीला गती दिली आहे. सिंचन विहिरीचे प्रस्ताव तपासुन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुर करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न माझ्या परस्पर कुणी करीत असेल तर, याबाबतीत दक्षता घेऊ.
- प्रशांतसिंह मरोड, गटविकास अधिकारी तथा प्रशासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT