Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : खरीप हंगामासाठी ९१३ कोटींचे पीककर्ज वाटप

Kharif Season Crop Loan Update : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू असून आतापर्यंत ९१३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

Rushikesh Kalange

Washim Crop Loan Update : या खरीप हंगामार्ज वाटप सुरू असून आतापर्यंत ९१३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नवीन पीककर्ज घेण्यास पात्र असलेले आणि नूतनीकरणापासून दूर असलेल्या २९ हजार ३६२ शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीककर्जाचे नूतनीकरण करावे, असे आवाहन षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पीककर्ज वाटप करण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार ३८८ शेतकऱ्यांना एक हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

सोमवार (ता. २६)पर्यंत ९२ हजार ६२६ शेतकऱ्यांना ९१३ कोटी १ लाख २९ हजार रुपये खरीप पीककर्ज वाटप केले आहे.

खरीप पीककर्ज वाटपाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पीककर्ज वाटप करणे तसेच पीककर्ज वाढीसह नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

सर्व बँका पीककर्ज वाटपासाठी गावोगावी शिबिरे घेत आहेत, शेतकऱ्यांच्या घरी जाऊनही कर्जाचे नूतनीकरणाबाबत आवाहन करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT