Jaljeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Mission : जलजीवनच्या ९० विहिरी चाचणीत फेल

Department of Rural Water Supply : नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून खोदलेल्या विहिरींपैकी आणखी ४० विहिरी कोरड्या गेल्याने या योजनेतील आतापर्यंत तब्बल ९० विहिरी कोरड्या गेल्या आहेत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे, उद्भव झालेल्या विहिरी फेल जात आहेत. मंजूर १,२२२ पाणीपुरवठा योजनांपैकी ६०४ योजनांमधील विहिरींच्या उद्भवाची मे व जूनमध्ये भूजल शास्त्रज्ञांकडून तपासणी झाली.

त्यानंतर खोदलेल्या विहिरींपैकी आणखी ४० विहिरी कोरड्या गेल्याने या योजनेतील आतापर्यंत तब्बल ९० विहिरी कोरड्या गेल्या आहेत. यामुळे या ठिकाणी उद्भव विहिरींची जागा बदलून नवीन विहिरी खोदण्याची नामुष्की ओढवली आहे. यातील ६६ विहिरी या आदिवासी भागातील असून, सुरगाणा या एकमेव तालुक्यातील ३२ विहिरींचा यात समावेश आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १,४१० कोटींच्या १,२२२ योजनांना मंजुरी दिली असून त्यातील ६०४ योजनांच्या विहिरींची कामे एप्रिलपर्यंत पूर्ण झाली. या ६०४ विहिरींच्या उद्भवाची चाचणी मे व जूनमध्ये झाली होती. त्या वेळी ५० विहिरी कोरड्या गेल्या होत्या.

त्यानंतर पुढे पावसाळा संपल्यानंतर आणखी विहिरींची कामे पूर्ण झाली असून त्यापैकी आणखी ४० विहिरी कोरड्या निघाल्या आहेत. यामुळे आतापर्यंत ९० पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या गेल्याने तेथे नवीन विहिरी खोदण्यास ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने परवानगी दिली आहे. कोरड्या विहिरींपैकी सर्वाधिक विहिरी सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत आहेत.

सुरगाण्यात ३२ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात ११ विहिरी कोरड्या गेल्या आहेत. या विहिरींची उद्भव चाचणी मेमध्ये झाली होती. आतापर्यंत केवळ ६०४ विहिरींची उद्भव चाचणी झाली आहे. त्यानंतर खोदलेल्या विहिरींची अद्याप उद्भव चाचणी झालेली नसल्याने येत्या मेपर्यंत या नापास विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय कोरड्या विहिरी (कंसात विहिरींची संख्या) : निफाड (३), सिन्नर (३), नाशिक (३), मालेगाव (३), बागलाण ( २), कळवण ( ७), चांदवड ( ४), देवळा ( १), इगतपुरी (२), पेठ (५), सुरगाणा (३२), दिंडोरी (६), त्र्यंबकेश्वर (११), नांदगाव (४).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT