Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : शहादा तालुक्यात खरिपाची ९० टक्के पेरणी

Kharif Season : यंदा तालुक्यात मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. जूनमध्येही काही प्रमाणात पावसाची हजेरी लागल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या.

Team Agrowon

Nandurbar News : शहादा तालुक्यात यंदा खरीप हंगामात ९० टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीप पेरणी हंगामात बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीनसह कडधान्याची पेरणी झाली आहे.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक ११ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन, तूर पिकास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. यंदा तालुक्यात मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. जूनमध्येही काही प्रमाणात पावसाची हजेरी लागल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या.

त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्यानंतर पावसाने उसंत दिल्यावर जमिनीत वाफसा झाल्यानंतर काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला उशिरा सुरुवात केली. तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप पेरणी सरासरी ९० टक्के झाली आहे.

या हंगामात बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन यांसह प्रमुख कडधान्यातील गळीत कडधान्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. यंदा तालुक्यात मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, भुईमूग, तीळ, मूग पेरणी अल्प आहे.

तालुक्यातील एकूण पीकपेरा (हेक्टमध्ये)

(१७ जुलै २०२५ अखेर)

खरीप ज्वारी : ८५६

बाजरी : ४७२

मका : ११९९३

मूग : २९३

उडीद : ३१०

तूर : ९१२

भुईमूग : ५८

तीळ : १०

सोयाबीन : ७,८३२

बा. कापूस : १६,७८५

जि. कापूस : २३,३२५

ऊस आडसाली : ३५९

केळी : ४,२०८

पपई : ३,२१५

मिरची : १,१२५

हळद : १५

कांदा : २१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT