Fertilizer Update Agrowon
ॲग्रो विशेष

Seed, Fertilizer Update : विदर्भात अनधिकृत बियाणे, खताचा ९ लाखांचा साठा जप्त

Agriculture Department : अनधिकृत बियाणे, खताविरोधात कृषी विभागाची कारवाई सुरुच आहे. अमरावती व कळंब (यवतमाळ) येथे दोन कारवायांमध्ये एचटीबीटी बियाणे, खतासह कीटकनाशकाचा साठा जप्त करण्यात आला.

Team Agrowon

Nagpur News : अनधिकृत बियाणे, खताविरोधात कृषी विभागाची कारवाई सुरुच आहे. अमरावती व कळंब (यवतमाळ) येथे दोन कारवायांमध्ये एचटीबीटी बियाणे, खतासह कीटकनाशकाचा साठा जप्त करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यात ट्रक (क्र. एमएच१५ एफव्ही ३४३४) मधून खत आणि कीटकनाशके उतरवीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्याआधारे कळंब तालुका कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश भोयर यांच्या पथकाने संयुक्‍तपणे कारवाई केली.

ट्रकमध्ये खताच्या संशयित ४०० बॅग, पीक संजीवके वाढविषयक ३६ बॉक्‍स तसेच १० प्रकारची पीक वाढ संजीवके आढळून आली. या निविष्ठांची किंमत सहा लाख तीन हजार ७२९ इतकी आहे.

विनोद दत्तात्रय ओंकार यांनी गजानन खेरडे यांच्या भाड्याने घेतलेल्या घरात या निविष्ठांची साठवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडे साठवणुकीचा कोणताच परवाना मिळून आला नाही.

त्यासोबतच याप्रकरणी ऑरगॅनिक अपॉच्युनिटी कंपनी नाशिक, नमे ऑरगॅनिक (नरखेड, नागपूर) यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील एका कारवाईत एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या अशोक भाटे (रा. देशमुख लॉन जवळ, अमरावती) याच्या विरोधात गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

४४२ पाकीट बियाणे (किंमत ३,६७,१०४ रुपये), महिंद्रा मालवाहू वाहन (किंमत ५,०००००) असा एकूण ८ लाख ७७ हजार १०४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, गोपाळ देशमुख, अजय तळेगावकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दादासाहेब पवार, पवनकुमार ढोमणे व रविकांत उईके यांनी ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT