Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : कोयनेत पाण्याचा फ्लो वाढला, धरणात ८९ टीएमसी पाणीसाठा जमा

Dam Water storage : गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात अपुऱ्या पावसाचा फटका शेतीसह धरणातील पाण्यास बसला आहे. ऑक्टोबर महिना सुरू होऊनही अजूनही एकही धरण शंभर टक्के भरलेले नाही. वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात ८९.०९ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ११ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील अपुरा पावसाच्या झळा शेतीसह धरणांना बसू लागल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून किमान दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागतो. मात्र यावर्षी अगदी उलट चित्र निर्माण झाले आहे. अगदी जून महिन्यापासूनच पावसाचे आगमन अडखळत झाले आहे. यामुळे पेरण्याही रखडल्या होत्या. त्यानंतर झालेल्या पावसावर कशातरी पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर पावसाच्या दडीमुळे पिके अडचणीत आली आहेत. या पद्धतीची परिस्थिती धरणाची झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात गतवर्षी सर्वच धरणात जवळपास शंभर टक्के भरली होती. तसेच सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. यावर्षी विरुद्ध परिस्थिती झाली असून एकही धरण शंभर टक्के भरलेले नाही. जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणांत ८५.३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणाचे अजूनही एकदाही दरवाजे उघडावे लागले नाहीत. कोयना धरणात मंगळवारी (ता. २ ऑक्टोबर) सकाळी आठपर्यंत एकूण ९४.१९, तर उपयुक्त ८९.०९ टीएमसी म्हणजेच ८८.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

उरमोडी धरण माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसह सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण धरण आहे. या धरणात अवघा ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम, कण्हेर परिस्थितीही गतवर्षीच्या तुलनेत कमीच पाणीसाठा आहे. धोम-बलकवडी, तारळी धरणाची परिस्थिती चांगली असून या धरणात जवळपास गतवर्षी इतकाच पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT