Animal Husbandry Department Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Job Vacancies : राज्य शासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये एकूण मंजूर असलेल्या २११ पदांपैकी तब्बल ८७ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : राज्य शासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये एकूण मंजूर असलेल्या २११ पदांपैकी तब्बल ८७ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात राज्य पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहेत. या दोनही विभागांमध्ये जिल्हा साहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि इतर अशी एकूण २११ पदे मंजूर आहेत.

परंतु गेल्या काही वर्षांपासून यापैकी अनेक पदे रिक्त आहे. सद्यःस्थितीत दोनही विभागातील तब्बल ८७ पदे रिक्त आहेत. त्याचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या पशुपालनावर होताना दिसत आहे. लम्पी स्कीन आटोक्यात आणताना असलेल्या अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण आला होता.

जिल्ह्यात गायी, म्हशी, शेळ्या, डुक्कर असे १ लाख ८८ हजार ९९ प्राणी आहेत. या प्राण्यांवर उपचार करणे असलेल्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे मोठ्या समस्येला पशुपालकांना सामोरे जावे लागते. ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी यापूर्वीच पशुपालकांनी केली आहे.

पशुविकास अधिकारी नसल्याने पशुधनावर वेळेत उपचार होत नाही. याशिवाय विविध योजनांचा लाभ घेताना देखील अडचणी निर्माण होतात.
- अर्जुन पोपकर, शेतकरी, सावंतवाडी
पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. या पदाची भरती प्रकिया गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
- ज्योती खरे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT