Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : परभणी जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये ८५ टक्के जलसाठा

Khandesh Water Stock : यंदाच्या पावसाळ्यात पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पातील गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या पावसाळ्यात पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पातील गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गुरुवारी (ता. १७) लघू सिंचन प्रकल्पात सरासरी ४२.२०५ दलघमीपैकी ३६.०५४ दलघमीनुसार ८५ टक्के जलसाठा होता.

१७ लघू सिंचन प्रकल्प तसेच करपरा व मासोळी या दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा आहे. चालू रब्बी हंगाम तसेच येत्या उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१७ लघू प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा....

जायकवाडी पाटबंधारे विभागाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त जलसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे. गुरुवारी (ता. १७) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ३६.०५४ दलघमीनुसार ८५ टक्के जलसाठा आहे.

१०० टक्के जलसाठा उपलब्ध झालेल्या लघू प्रकल्पांमध्ये देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, कवड, मांडवी, दहेगाव (सर्व ता. जिंतूर)राणीसावरगाव, टाकळगाव, कोद्री (सर्व ता. गंगाखेड), तांदूळवाडी (ता. पालम) तसेच पाडाळी (जि. जालना) येथील लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

पेडगाव (ता. परभणी) लघू प्रकल्पांत ५० टक्के, आंबेगाव (ता. मानवत) लघू प्रकल्पात ३५ टक्के, झरी (ता. पाथरी) लघू प्रकल्पांमध्ये ९४ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) लघू प्रकल्पांमध्ये ९४ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) लघू प्रकल्पांमध्ये ९५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी (२०२३) १७ ऑक्टोंबर रोजी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ४.८४८ दलघमी (११ टक्के) जलसाठा होता. तीन लघू प्रकल्प कोरडे पडले होते तर ९ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला होता.

मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा...

करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. १७) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात २४.९०० दलघमी म्हणजेच १०० टक्के तर मासोळी धरणामध्ये २७.१४१ दलघमी म्हणजेच १०० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पांतसरासरी ५२.०४१ १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी (२०२३) १७ ऑक्टोंबर रोजी करपरा मध्यम प्रकल्पांत ४.९८७ दलघमी (२० टक्के) तर मासोळी मध्यम प्रकल्पात ४.२३२ दलघमी (१६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT