Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नागपुर विभागात ७८६ हेक्टरमधील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान

Crop Damage : सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू असला तरी ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसासह गारपिटीचा मारा होत आहे. गेल्या आठवड्यापासून नागपूरसह पूर्व विदर्भात अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Nagpur News : सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू असला तरी ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसासह गारपिटीचा मारा होत आहे. गेल्या आठवड्यापासून नागपूरसह पूर्व विदर्भात अशी स्थिती आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर विभागातील सुमारे ७८६.४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालातून समोर आले आहे. सर्वाधिक नुकसान वर्धा जिल्ह्यात झाले. यात भाजीपाला व उन्हाळी पिकांचा समावेश आहे.

काही दिवसांत नागपूरसह विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त केले आहे. त्यामुळे तापमानाचा पाराही खाली आला. उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पिकांचे नुकसान झाले आहे.

नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये ७ ते १२ एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, तीळ, मका, भात पिकांसह संत्रा, मोसंबी, आंबा, टरबूज इतर फळबागा व भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसानीच्या अहवालानुसार अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, रामटेक व उमरेड, वर्ध्यातील वर्धा, हिंगणघाट, सेलू, आष्टी, भंडाऱ्यातील भंडारा व लाखनी, गोंदियामधील गोंदिया, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, तिरोडा, चंद्रपूरमधीलवरोरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा व कुरखेडा या तालुक्यातील ७८६.४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

जिल्हानिहाय हेक्टरी नुकसान

जिल्हा बाधित क्षेत्र

नागपूर ९७.४

भंडारा १३

वर्धा ५२७.७

गोंदिया ६८.१

गडचिरोली ३९.७

चंद्रपूर ४०.५

एकूण ७८६.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT