Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Seed For Rabi Season : रब्बीसाठी ७५ हजार १३९ क्विंटल बियाण्यांची गरज

Team Agrowon

Nanded News : आगामी रब्बी हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यासाठी शेतकऱ्‍यांना ७५ हजार १३९ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यासोबतच एक लाख टनापेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापरही होणार आहे.

बियाण्यांचा पुरवठा खासगी व सार्वजनिक यंत्रणांकडून पुरवठा होणार आहे. तर खताचा शिल्लक साठा ८४ हजार टन असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात खरिपानंतर शेतकऱ्‍यांनी रब्बी हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. परंतु यंदा पावसाअभावी रब्बीच्या पेऱ्‍यात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने यंदा चार लाख हेक्टरवर रब्बीत पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त करत बियाणे तसेच खताचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात रासायनिक खताचा सरासरी वापर एक लाख ५३६ टन एवढा आहे. तर कृषी आयुक्तालयाकडून एक लाख ८२०० टन खताचे आवंटन मंजूर केले आहे. दरम्यान, मागील हंगामातील ८३ हजार ९५९ टन खत शिल्लक आहे.

यामुळे रब्बीसाठी खताची मुबलकता असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. रब्बीत चार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु ऑक्टोबरमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

८४ हजार टन रासायनिक खत शिल्लक

जिल्ह्यात रब्बीसाठी एक लाख ५३६ टन खताचा वापर होतो. यानुसार कृषी विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे खताची मागणी केली होती. यानुसार एक लाख ८२०० टन खताचे आवंटन मंजूर केले आहे.

तर जिल्ह्यात मागील खरीप हंगामातील ८३ हजार ९५९ टन खत शिल्लक आहे. यात युरिया ९ हजार ६५२ टन, डीएपी ११ हजार १८२ टन, एमओपी ३,९७८ टन, एनपीके ४४ हजार ८८५ टन, एसएसपी १४ हजार २६२ टन खताचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

SCROLL FOR NEXT