Kolhapur ZP agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात ७३ पदे रिक्त, पशुधनाच्या पर्यायाने शेतकरी अडचणीत

Kolhapur ZP Department : कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात तब्बल ७३ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

sandeep Shirguppe

Department of Animal Husbandry : कोल्हापूर जिल्हा हा शेती बरोबर दूग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रचलीत आहे, परंतु मागच्या काही वर्षात जिल्हा पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची भरतीच झाली नसल्याने पशुधनाच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात तब्बल ७३ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तालुका पशुधन विकास अधिकारी यांची बारा तालुक्यांची पदे गेली पाच वर्षे रिक्त होती. तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्या २५ जागा भरल्या आहेत.

मात्र प्रत्यक्षात पशुधन विकास अधिकारी कामावर कधी रुजू होणार असा प्रश्न आहे. वर्णोपचार आणि परिचर पदांची भरती रद्द केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे १३९ पशुवैद्यकीय दवाखाने असून सुमारे आठ लाख, ५२ हजार पशुधन आहे. गेली दोन वर्ष लम्पीने सुमारे ११३० जनावरे दगावली आहेत. पावसाच्या तोंडावर घटसर्प व फऱ्या आजाराने पशुधन अडचणीत येईल, अशी चिंता शेतकऱ्यांच्यात आहे. जिल्हा परिषद पशुधन विभागाच्या वतीने एक लाख पंचेचाळीस हजार जनावरांना घटसर्पचे लसीकरण केले आहे.

पशुधन विकास अधिकारी हे प्रशासकीय पद असून राज्य व केंद्र शासनाच्या योजना राबवणे व तांत्रिक नियंत्रण ठेवणे आणि शेतकरी व शासनामध्ये दुवा साधने अशी कामे ते करतात. मात्र गेली पाच वर्षे १२ पदे रिक्त होती .आता भरती झाली असून त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये पशुधन विकास अधिकारीची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३४ पदे रिक्त होती. यातील २५ पदे भरली असून नऊ पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक ८२ पदे मंजूर आहेत. यापैकी २६ पदे रिक्त होती, यापैकी १२ पदे भरली असून १४ पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकऱ्यांना जनावरांना उपचार घेताना मदत करणे, लसीकरण करणे अशी कामे करणे यासाठी वर्णोपचार व परिचर म्हणून पद आहे. वर्णोपचार ५० पदे रिक्त आहेत. वर्णोपचारसाठी दीडशे पदे मंजूर आहेत. या पदाची भरती शासनाने बंद केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वर्णोपचार पदाची भरती रद्द

याबाबत जिल्हा पशुवर्णोपचार पदाची भरती रद्दसवंर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर म्हणाले की, ‘पशुधन विकास अधिकारी यांची २५ पदे भरली असून त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे. वर्णोपचार पदाची भरती रद्द केली आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पशुधनासाठी शंभर टक्के लसीकरण झाले आहे.

पशुधनाला लसीकरण करून घ्यावे...

‘पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे चारा दूषित होतो. यामुळे घटसर्प, फऱ्या आजार याची लागण होते. यासाठी शेतकऱ्यांनी पशुधनाला लसीकरण करून घ्यावे. गोठ्यात माशा, डासांचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांना गांधड्या उठतात. यामुळे लम्पी पुन्हा तोंड वर काढू शकते. परिणामी दुधाचे उत्पादन घटते. शेतकऱ्यांनी माशांची, डासांची उत्पत्ती होऊ देऊ नये’, असे जिल्हा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT