Shetkari Sangh Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Kolhapur : कोल्हापूर शेतकरी संघात ७२ लाखांचा घोटाळा, व्यवस्थापकावर गुन्हा

Shekari Sangh Fraud : शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत पेट्रोल, खत खरेदी विक्री व बझारच्या माध्यमातून व्यवहार केला जात होता.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh Fraud : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संघाच्या कार्वे शाखेत मागच्या ६ महिन्यांपासून अपहार झाल्याचे वृत्त समोर येत होते. दरम्यान या घोटाळ्या प्रकरणी चंदगड तालुक्यातील कार्वे शाखेचे व्यवस्थापक शंकर रामू इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दैनिक सकाळने पाठपुरावा करून याचा छडा लावला होता. यातील तपास अधिकारी जिल्हा उपनिबंधकांनी शंकर इंगवले यांनी ७२ लाख ७५ हजार ८२५ लाखांचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्यावर चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत पेट्रोल, खत खरेदी विक्री व बझारच्या माध्यमातून व्यवहार केला जात होता. यामध्ये १२ जुलै २०१३ पासून इंगवले काम पाहत होते. हा व्यवहार रोखीने किंवा उधारीवर होतो. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या माध्यमातून झालेल्या इंधनाच्या विक्रीची प्रत्यक्ष विक्री झालेली होती.

मात्र, या रकमेची उधारी येणेबाकी दाखवून अपहार केला आहे. याशिवाय इतर उत्पादनांची विक्री करून ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपयांचा अपहार केला आहे. त्यामुळे संघाचे लेखापरीक्षक आणि फिर्यादी चार्टर्ड अकाउंटंट अशोक उमराणी यांच्या तक्रारीवरून चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तत्पूर्वी, शाखेतील सर्व दप्तर ताब्यात घेऊनही याची कसून चौकशी केली.

याबाबत मागच्या कित्येक महिन्यांपासून दैनिक सकाळने याचा पाठपुरावा करून प्रकरण उघडकीस आणले होते. शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत सुमारे ८० लाखांचा अपहार झाल्याचे वृत्त २७ ते २९ मे २०२३ दरम्यान प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शेतकरी संघाच्या याच अपहाराची आणि 'सकाळ'मधून प्रसिद्ध झालेल्या मुद्द्यानुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिले होते.

यामध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या संघांतर्गत चौकशीत ८१ लाखांच्या अपहारावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर लेखापाल ए. के. उमराणी यांची प्राधिकृत लेखापाल म्हणून नियुक्ती करून याची चौकशी केली. यामध्ये ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपयांचा अपहार उघड झाला.

७२ लाखांच्या वसुलीकडे लक्ष

शेतकरी संघाच्या कार्वे शाखेत ७२ लाखांचा अपहार झाला. शाखा व्यवस्थापक शंकर इंगवले यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला. आता पुढे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, अपहारात हडप केलेली संघाची ७२ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी शेतकरी संघाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. तसेच, जिल्हा उपनिबंधकांनीही यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

Cotton Farmers Crisis: कापूस वेचणी दर स्थिर, मजूरटंचाईची समस्या मात्र कायम! शेतकऱ्यांसमोर नवे संकट

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT