Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : यवतमाळला नुकसानीबाबत ७० हजार पूर्वसूचना प्राप्त

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यात शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीच्या आतापर्यंत ७० हजार पूर्वसूचना कृषी विभागाकडे दाखल झालेल्या आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यात शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीच्या आतापर्यंत ७० हजार पूर्वसूचना कृषी विभागाकडे दाखल झालेल्या आहेत. कृषी विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, आता शेतकऱ्यांच्या नजरा पीकविम्याच्या मदतीकडे लागलेल्या आहेत.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यांची मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यानंतर रब्बी हंगामावरही अवकाळी पावसाने आक्रमण केले आहे. आतापर्यंत पिकांच्या नुकसानीच्या ७० हजार तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. काही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाचे पाणी शेतात साचल्याने हरभरा पिकावर मररोग दिसून येत आहे. त्याचा फटका शेतपिकांना बसला आहे. अतिपाण्यामुळे पिके पिवळी पडलेली आहेत. त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी आता पीकविमा कंपनीकडे नुकसानाची माहिती पाठविली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा उतरविला आहे. खरिपात अतिवृष्टीने हाहाकार माजविला. त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने रब्बी हगामाला फटका बसला आहे.

नुकसान झालेल्या ७० हजार शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. त्यामुळे आता दाखल झालेल्या पूर्वसूचनांपैकी किती शेतकऱ्यांना मदत मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा नियमित आढावा

नुकसानीनंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात झालेले नुकसान व दररोज होणारे पंचनामे यांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. आशिया स्वत: घेत आहेत. पीकविमा कंपनीने लक्ष देऊन काम करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

Agri Pump Cable Theft: कृषिपंपांच्या केबल चोरीने शेतकरी त्रस्त

Raisin Deals: बेदाणा सौदे ‘झीरो पेमेंट’साठी २५ ऑक्टोबरनंतर महिनाभर बंद

Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना

SCROLL FOR NEXT