Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : मराठवाड्यातील ६८ प्रकल्प पडले कोरडे

Water Shortage : मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांपैकी ६८ लघू, मध्यम, प्रकल्प कोरडे पडले आहेत. सर्व प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ३७ टक्क्यांवर आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांपैकी ६८ लघू, मध्यम, प्रकल्प कोरडे पडले आहेत. सर्व प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ३७ टक्क्यांवर आला आहे. झपाट्याने खालावत असलेले पाणी साठ्याची पातळी चिंता वाढवते आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर, ७५ माध्यम प्रकल्पातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर, ७४९ लघू प्रकल्पातील पाणीसाठा २३ टक्क्यांवर, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांवर, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर आला आहे. सर्वच प्रकल्पातील पाणीसाठा गत तीन वर्षांतील पाणीसाठ्याच्या तुलनेत आजच्या घडीला नीचांकी पातळीवर आला आहे.

मोठे प्रकल्प

मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात सर्वांत कमी ६ टक्के, पाठोपाठ निम्न तेरणा १२ टक्के, मांजरा व निम्न दुधना प्रत्येकी १८ टक्के, सिद्धेश्‍वर ३७ टक्के, जायकवाडी ४१ टक्के, निम्नमणार ५० टक्के, येलदरी ५७ टक्के तर विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्प स्थिती

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पांपैकी धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पात सर्वांत कमी ९ टक्के, त्यापाठोपाठ जालनामधील ७ प्रकल्पात ११ टक्के, परभणीमधील दोन प्रकल्पात १४ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ व लातूरमधील ८ प्रकल्पात प्रत्येकी १७ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ३३ टक्के तर नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पात सर्वाधिक ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

लघू प्रकल्प स्थिती

मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी जालनामधील ५७ लघू प्रकल्पात सर्वात कमी ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ परभणीमधील २२ प्रकल्पांत ११ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात १४ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत १९ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २० टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघू प्रकल्पांत २२ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पांत ५९ टक्के, तर नांदेडमधील ८० लघू प्रकल्पात सर्वाधिक ६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

धाराशिवमधील सर्वाधिक लघू प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी ६६ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३५ लघू प्रकल्प धाराशिवमधील आहेत. त्यापाठोपाठ बीडमधील १७, छत्रपती संभाजीनगरमधील ९ व लातूरमधील ५ लघू प्रकल्पांचा कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांमध्ये समावेश आहे. याशिवाय बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एक मध्यम प्रकल्प ही कोरडा पडला आहे.

२६६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील ७५ माध्यम व ७५० लघू प्रकल्पांपैकी २६६ लघू मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये २४६ लघू व २० मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २० मध्यम प्रकल्पांमध्ये जालना व नांदेडमधील प्रत्येकी १ धाराशिवमधील ७, बीडमधील ६, लातूरमधील ३ व छत्रपती संभाजीनगरमधील २ प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या २४६ लघू प्रकल्पांमध्ये धाराशिवमधील सर्वाधिक ९२, बीडमधील ५६, लातूरमध्ये ४८, छत्रपती संभाजीनगरमधील २७, परभणीतील १२, जालन्यातील १० व नांदेडमधील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT