Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement Center : छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा तूर खरेदी केंद्रांवर ६७ शेतकऱ्यांची नोंदणी

Tur Market : शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा,असे आवाहन आधीच जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु.राठोड यांनी केले आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात आधारभूत दरानुसार महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत तूर खरेदीसाठी ११ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यावरून आतापर्यंत ६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा,असे आवाहन आधीच जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु.राठोड यांनी केले आहे.

जिल्ह्यात तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना, विहामांडवा या ११ तूर खरेदी केंद्राचा समावेश आहे.

तूर खरेदीकरिता शेतकरी नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात येत असून प्रत्यक्षात तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. खरेदी १३ मेपर्यंत सुरु राहणार आहे. शिवाय नोंदणीसाठी ही महिनाभराची मुदतवाढ दिलेली आहे.

आधारभूत किमतीने खरेदी व बाजार दरात अंतर कमी असल्याने नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल फारसा नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच नोंदणी कमी झाल्याचे दिसत असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्राने दिली.

जालन्यात १५ केंद्रांवरून ७६९ नोंदणी

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुमारे १५ केंद्र तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावरून आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी ७६९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली या केंद्रांवरून आधी सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली होती. खरेदी केलेल्या सोयाबीनची अजूनही गोडाऊन मध्ये साठवणूक सुरूच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT