Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : दौंड तालुक्यामध्ये ६४३९ हेक्टर गव्हाची पेरणी

Sowing Update : दौंड तालुक्यात या वर्षी ६४३९ हेक्टर गव्हाची पेरणी झाली होती. तालुक्यात २७ हजार हेक्टरमध्ये वेगवेगळी पिके घेण्यात आली असून‌, त्यापैकी एकट्या गहू पिकाचा वाटा सरासरी २५ टक्के आहे.

Team Agrowon

Daund News : दौंड तालुक्यात या वर्षी ६४३९ हेक्टर गव्हाची पेरणी झाली होती. तालुक्यात २७ हजार हेक्टरमध्ये वेगवेगळी पिके घेण्यात आली असून‌, त्यापैकी एकट्या गहू पिकाचा वाटा सरासरी २५ टक्के आहे.

सर्वाधिक ऊस पिकविणारा तालुका म्हणून दौंड तालुका ओळखला जातो. उसाचे पीक गुऱ्हाळ घरावर किंवा कारखान्यावर गेल्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये येणारे पीक म्हणून गहू पिकाकडे पाहिले जाते.

मुळा-मुठा व भीमा नदीच्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक गावाची लागवड केल्याचे या वर्षी दिसत आहे. दौंड तालुक्यात दरवर्षी सरासरी ५८२१ हेक्टर गहू पिकवला जातो. यंदा दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गहू शेती दिसत असली तरी गहू पीक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

कारण सन २०२२/२३ च्या रब्बीमध्ये उच्चांकी ७५३५ हेक्टर गहू पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते, असे तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.

बहुंताशी गव्हाच्या ओंबीमध्ये पुरेपूर टपोरा गव्हाचा दाणा भरला आहे. संकरित व आधुनिक बियाण्यांमुळे एका ओंबीमध्ये १०० ते १२० गव्हाचे दाणे भरले आहेत, असे शेतकरी बापूराव कोंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT