Animal Vaccination Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Vaccination : बारामतीत ६१ हजार जनावरांचे लसीकरण

Animal Health and Disease Control : ‘केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये पुणे जिल्ह्यात लाळ्या खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी- ५ वी १६ ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे.

Team Agrowon

Baramati News : ‘केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये पुणे जिल्ह्यात लाळ्या खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी- ५ वी १६ ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत बारामती तालुक्यामध्ये आतापर्यंत ६१ हजार ६६० जनावरांचे लसीकरण झाले आहे,’’ अशी माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. आर. पोळ यांनी दिली.

पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण हे शंभर टक्के केंद्र सरकार पुरस्कृत आहे. या अंतर्गत लसीकरणासाठी फेरी ५ वी राबविण्यास आवश्यक लसमात्रा एप्रिल २०२४ मध्ये जिल्हास्तरावर केंद्र शासनाद्वारे पुरवण्यात आल्या होत्या. सदर योजनेचे सर्व जिल्हा सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन यांनी प्रतिबंधात्मक फेरी ४५ दिवसांत म्हणजेच ता. २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रत्यक्ष लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी तालुका कृषी संवर्धन विभागाकडे देण्यात आली आहे.

आजाराची लक्षणे....

जाणवराचे खाणे-पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते.

जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात.

जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते.

पायाने अधू असलेले जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

बारामतीत झालेले लसीकरण

गाय वर्ग १,२०,२६१

म्हैस वर्ग १,१३,६२२

एकूण १,३३,८८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT