Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : नागपूर विभागात साडेपाच लाख शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख

Agristack Yojana : ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांना डिजिटल ओळख (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहे.

Team Agrowon

Nagpur News : ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांना डिजिटल ओळख (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नागपूर विभागातील ५ लाख ५६ हजार ७१९ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

ॲग्रिस्टॅक ही योजना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाच्या साहाय्याने राज्यात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲग्रिस्टॅकला प्राधान्य दिले आहे. ॲग्रिस्टॅकअंतर्गत नागपूर विभागात आतापर्यंत ५ लाख ५६ हजार ७१९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

यामध्ये गोंदिया जिल्ह्यात १ लाख ५ हजार ३४७ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात ९३ हजार ४२३, भंडारा जिल्ह्यात ७४ हजार ६६७, गडचिरोली जिल्ह्यात ६७ हजार २२५, वर्धा जिल्ह्यात ७१ हजार ६२३ तर नागपूर जिल्ह्यात ७० हजार ४४४ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

महसूल आणि कृषी विभागातर्फे ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणीला प्राधान्य देण्यात आले असून जिल्हास्तरावर नियमित आढावा घेण्यात येत असल्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहे.

राष्ट्रीय स्तरावर डिजिटल पायाभूत सुविधा असल्यामुळे कृषी क्षेत्राची संबंधित सर्व माहिती एकत्रित केली जाणार आहे. शेतकऱ्यांचे भूसंपदा, नोंदणीचे तपशिल, पीक लागवडीचा डेटा, शेतीमाल विक्री आणि खरेदीची माहिती, वित्तीय व्यवहार आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज या सर्व बाबींचा समावेश ॲग्रिस्टॅक मध्ये असणार आहे.

ॲग्रीस्टॅकचे फायदे

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पिकाला चांगले दर मिळतील.

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि नवीन रोजगार निर्माण होतील.

कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल.

डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत व कृषी धोरणामध्ये सुधारणा करण्यास सक्षम ठरेल.

अन्न सुरक्षेला चालना देईल आणि देशाला स्वयंपूर्ण बनविण्यास मदत करेल.

शेतकऱ्यांचे खर्च कमी होतील, उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळेल तसेच कृषी विषयक साहाय्य आणि सल्ला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT