Sangli APMC Election News Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli APMC : सांगली फळ मार्केटमधील ५६ व्यापाऱ्यांना फेरनोटीस

APMC News : सांगली कृषी उप्तन्न बाजार समितीच्या विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये खुल्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारलेल्या ५६ गाळेधारकांना बाजार समितीने दुसरी नोटीस दिली.

Team Agrowon

Sangli News : सांगली कृषी उप्तन्न बाजार समितीच्या विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये खुल्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारलेल्या ५६ गाळेधारकांना बाजार समितीने दुसरी नोटीस दिली. पहिल्या नोटिसला उत्तर दिले नाही. त्यामुळे दुसऱ्या नोटिसला मुदतीत उत्तर न दिल्यास गाळ्यांवर हातोडा मारला जाणार असल्याची माहिती बाजार समितीच्या प्रशासनाने दिली.

बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कालावधीत सहकार विभागाच्या आदेशान्वये आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीने कोल्हापूर रस्त्यावरील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये ५६ व्यापाऱ्यांना ठराव करून जागा दिली होती. त्या व्यापाऱ्यांनी या जागेवर पत्र्याचे शेड उभारले आहे. मात्र, शेड उभारलेली जागा खुला भूखंड आहे.

याशिवाय याच बाजूला बेदाणा गोदामासाठी जागा आरक्षित ठेवल्यात आली आहे. मात्र, तत्कालीन संचालकांना संबंधितांकडून मागणीनुसार अनामत रक्कम घेऊन जागा दिली.

आता त्याबाबतच्या तक्रारी शासनाच्या सहकार विभागाकडे गेल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

खुला भूखंड, बेदाणा गोदामासाठी आरक्षित असलेली जागा बाजार समितीने पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार बाजार समितीने सर्व ५६ गाळेधारकांना नोटीस दिली आहे. नोटीस देऊन चार महिने झाले तरी संबंधित गाळेधारकांनी नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे दुसरी नोटीस देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT