Brazil Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Brazil Rain : ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि चिखलामुळे सुमारे ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Brazil Flood Update : ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि चिखलामुळे सुमारे ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो लोकांना आपले घर सोडावे लागले असून सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे.

दरम्यान, पुरामुळे घरे, पूल कोसळले असून रस्त्यांवर, ढिगाऱ्यांत अनेक लोक अडकली आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्कालीन पथकांनी बचाव कार्य सुरू केले आहे.

अल जझीरा वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, देशाच्या नागरी संरक्षण एजन्सीने सांगितले, की रिओ ग्रॅन्डे डो सुल राज्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणांवर ताण पडत आहे आणि पोर्टो अलेग्रेच्या महानगराला धोका आहे.

या घटनेत ५६ लोकांचा मृत्यू झाल्याबाबत गव्हर्नर लेइट यांनी शोक व्यक्त केला आहे. या बाबत ते म्हणाले, की आम्ही इतिहासातील सर्वांत वाईट आपत्तीचा सामना करत आहोत,’’

दरम्यान, बचाव कार्य सुरू असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली असून केंद्र सरकारकडून मदतीचे आश्‍वासन दिले आहे. पूर आणि पावसासाठी त्यांनी हवामान बदलालाही जबाबदार धरले आहे. ब्राझीलच्या हवामान खात्यानेही पावसाच्या वाढत्या तीव्रतेला ‘एल निनो’ जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT