Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : साताऱ्यात ५५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

Sugarcane Season : यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याले असलेतरी उसाचे क्षेत्र कमी आहे. त्या तुलनेत कारखान्यांची संख्याही वाढली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला गती आली असून मजूर यंत्रणा विस्कळीत असल्याने अनेक कारखान्यांना उद्दिष्ट गाठताना अडचणी येत आहेत. आतापर्यंत नऊ सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांनी ६० लाख ४८ हजार ३२३ टन उसाचे गाळप करून ५५ लाख ३० हजार ४४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

जरंडेश्वर कारखान्याने सर्वाधिक दहा लाख टनांवर उसाचे गाळप करीत आघाडी घेतली आहे. खासगीपेक्षा सहकारी कारखान्यांना अधिक उतारा मिळत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याले असलेतरी उसाचे क्षेत्र कमी आहे. त्या तुलनेत कारखान्यांची संख्याही वाढली आहे. यावेळेस नऊ सहकारी व आठ खासगी असे १७ साखर कारखान्‍यांतून गाळप सुरू आहे.

जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान गाळप सुरू झाले आहे. तोडणी वाहतूक यंत्रणा यावेळेस विस्कळित असून, ऊस वेळेत तुटावा, यासाठी हार्वेस्टरचा वापर अधिक केला जात आहे.

हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकरी संघटनांनी थोडी नमती भूमिका घेतली असली, तरी २८०० ते ३२०० रुपये पहिली उचल गेली आहे. यावेळेसही सहकारी कारखान्यांना सर्वाधिक उतारा मिळत असल्याचे अहवालातील आकडेवारीवरून दिसत आहे.

सहकारी कारखान्यांचा सरासरी १०.९३ व खासगी कारखान्यांचा सरासरी ७.६९ टक्के उतारा मिळत आहे. कारखान्यांत रयत अथणी शुगरला ११.७८ टक्के उतारा मिळाला, तर गाळपात खासगीमध्ये ‘जरंडेश्वर’ने आघाडी घेत सर्वाधिक दहा लाख ८९ हजार ९८० टन, तर सहकारीत कृष्णा कारखान्याने सहा लाख ६२ हजार ७२० टन उसाचे गाळप केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT