Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road: पुणे जिल्ह्यातील ५३८ पाणंद रस्ते खुले : जिल्हाधिकारी डुडी

Collector Jitendra Dudi: पुणे जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारीपासून मोहीम हाती घेण्यात असून एप्रिलअखेर एकूण ७०४ किलोमीटर लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत.

गणेश कोरे

Pune News: पुणे जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारीपासून मोहीम हाती घेण्यात असून एप्रिलअखेर एकूण ७०४ किलोमीटर लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. अतिक्रमित व बंद झालेले शिव रस्ते खुले करण्यासाठी ३१ मे पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणंद, शिव रस्ते लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त व बंद असल्यास ते वापरास खुले करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तहसीलदारांकडे यापूर्वी रस्ते खुले करण्याबाबत प्राप्त अर्जानुसार रस्ते खुले करण्याची कार्यवाही करावी.

भूमिअभिलेख विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग या बाबत गाव नकाशे ८ मे अखेर प्राप्त करून घ्यावेत. ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे गाडी मार्ग, पायमार्गाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करुन त्याप्रमाणे संबंधित भोगवटाधारकांची यादी ९ ते १५ मे या कालावधीत तयार करावी. संबंधित भोगवटाधारक, सहधारक व सरपंच यांची एकत्रित बैठक घेऊन रस्ता खुला करण्याबाबत १३ ते २३ मे या कालावधीत प्रयत्न करावे.

पोलिसांना बंदोबस्ताच्या सूचना

तहसीलदारांकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे रस्त्यांची मोजणी ही संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोफत करावी. या बाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते खुले करताना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त आवश्यक पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षकामार्फत मोफत बंदोबस्त पुरवावा. रस्ते वापरास खुले केल्यानंतर त्यांच्या मजबुतीकरणासाठी गट विकास अधिकारी यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT