Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump : मागेल त्याला सौर कृषिपंपसाठी जालन्यातून ५३ हजार अर्ज

Agriculture Pump : मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटला उदंड प्रतिसाद दिला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhjainagar News : मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटला उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ १४ दिवसांत १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३ हजार ६०३ अर्ज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील आहेत. शिवाय अर्ज करण्यात जालना जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली आहे.

तिचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसांत २७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील १,२२,४२१ शेतकऱ्यांनी वेबसाइटवर अर्ज दाखल केले होते. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत वेबसाइटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्यातून सर्वाधिक ५२,०६७ अर्ज दाखल झाले आहेत.

त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड २४,५२६ अर्ज, परभणी १५,०४३ अर्ज, छत्रपती संभाजीनगर ६,८८८ अर्ज आणि हिंगोली ५,०७९ अर्ज या जिल्ह्यांचा क्रम लागतो. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या वेबसाइटवर नोंदणी करा

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. वेबसाइटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाइटवर तपासता येते, असे महावितरणने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT