Pune News : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना पुणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत बारामतीतील उंडवडी येथे ५३.० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांसाठी तयारी सुरू केली आहे. तर पश्चिम पट्ट्यात भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवात झाली आहे.
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिले. तर तुरळक ठिकाणी उन्हाळी पिकांचे व भाजीपाला पिकांचे, आंबा यांसारख्या फळपिकांचे नुकसान झाले.
खरिपासाठी हा पाऊस पोषक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी वाफसा स्थिती येण्याची वाट पाहू लागले आहे. काही ठिकाणी सोयाबीन, कापूस, बाजरी, मूग, उडीद अशा बियाण्यांची खरेदी केली आहे. भात पट्ट्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर भागांत मागील पंधरा दिवसांत शेतीची कामे पूर्ण करून ठेवली होती. पाऊस झाल्यामुळे आता बीजप्रक्रिया करत असून अनेक ठिकाणी रोपवाटिकेच्या कामांना वेग आला आहे.
हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, भोसरी, चिंचवड, कळस येथे हलका पाऊस पडला. मुळशीतील थेरगाव, पिरंगुट, भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील शिवणे, वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे, जुन्नरमधील आपटाळे, ओतूर, खेडमधील चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, इंदापूरमधील लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णे, सणसर, दौंडमधील यवत, पुरंदरमधील भिवंडी, जेजुरी, परिंचे, वाल्हा परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या.
सोमवारी (ता.१०) सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
स्रोत - कृषी विभाग
हवेली - थेऊर १३.३, उरुळीकांचन २३.०, खेड १२.८, हडपसर १४.५, वाघोली ११.३, अष्टापूर १४.३
मुळशी - पौड १९, घोटावडे १९, थेरगाव, माले ११.५, मुठा १९.०
भोर - वेळू १७.३
मावळ - वडगाव मावळ १२.०, तळेगाव १२.०, काले १५.८, कार्ला ३१.८, खडकाळा १५.०, लोणावळा २०
जुन्नर - देऊळगाव १२..०, पाटस ३५.८, केडगाव १३.३, राहू १८.०, वरंवड २२.३, रावणगाव २३.५, दौंड ४३.०, बोरी १४, खामगाव १४.५, वडगाव बांदे १६.५, पारगाव ३०, बोरी पार्धी ११.८
खेड - वाडा, १२.३, राजगुरुनगर १५.५, कुडे १६.८, पाईट १०, कडूस १०.५
आंबेगाव - घोडेगाव ११.८, आंबेगाव ५७.८, कळंब १२, मंचर १३.५,
शिरूर - टाकळी २०, वडगाव ३०, न्हावरा ३०, मलठण २९, तळेगाव १९.३, रांजणगाव १९.३, कोरेगाव १२.८, पाबळ १३.०, शिरूर ४६.३
बारामती - माळेगाव ११.३, पणदरे १४.३, वडगाव १२, लोणी १७.५, सुपा ३५.५, मोरगाव २०.५
इंदापूर - भिगवण ११.८
दौंड - देऊळगाव १२, पाटस ३५.८, कडेगाव १३.३, राहू १८, वरवंड २२.३, रावणगाव २३.५, दौंड ४३, बोरी १४, खामगाव १४.५, वडगाव बांदे १६.५, पारगाव ३०, बोरी बार्धी ११.८
पुरंदर - सासवड १४.५, कुंभारवळण ११.८, राजेवाडी १४.५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.