Mango  Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : बापर्डे येथे ५२५ ग्रॅमचा देवगड हापूस आंबा

Mango Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन तब्बल ५२५ ग्रॅम आढळून आले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन तब्बल ५२५ ग्रॅम आढळून आले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट वजन असून, झाडावरील अन्य फळेदेखील ४५० ते ५०० ग्रॅम वजनाची आहेत.

बापर्डे येथील पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांची गावातच १०० हून अधिक झाडांची आंबा बाग आहे. या बागेतील आंबा काढणी सध्या सुरू आहे. दरम्यान, आंबा काढणी करताना एका झाडावरील फळे इतर झाडांच्या तुलनेत खूप मोठी दिसून आली.

त्यामुळे श्री. नाईकधुरे यांनी २१ मार्चला आंबा फळाचे वजन केले असता त्यांना फळाचे वजन ५२५ ग्रॅम झाले. त्यानंतर तीन दिवसांनी फळाच्या वजनात २२ ग्रॅमने घट झाली. २४ मार्चला वजन ५०३ ग्रॅम झाले.

या बाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी देखील वजनाची खात्री केली. ४५० ते ४८० ग्रॅम वजनाची अनेक फळे त्यांना त्या झाडावर दिसून येत आहेत.

देवगड हापूस फळाचे वजन सरासरी २०० ग्रॅम ते २५० पर्यंत असते. झाडांना योग्यवेळी पाणी दिले, खत व्यवस्थापन नीटनेटके केले तर फळाचे वजन वाढते. हे वजन देखील ३५० ग्रॅमपर्यंत जाते. परंतु पुरुषोत्तम नाईकधुरे यांच्या बागेत आढळून आलेला आंब्याचे वजन खूपच आहे. चिकित्सेअंती त्याचा निष्कर्ष काढता येईल.- डॉ. विजय दामोदर, आंबा विषयक शास्त्रज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT