Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : आळेफाटा उपबाजारात कांद्याला ५२१ रुपये भाव

Onion Export Ban : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता. १०) कांद्यास प्रति दहा किलोस ५२१ रुपयांचा बाजारभाव मिळाला.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा, ता. जुन्नर ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता. १०) कांद्यास प्रति दहा किलोस ५२१ रुपयांचा बाजारभाव मिळाला. या वेळी कांद्याच्या १३ हजार ६९६ पिशव्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्यास प्रति दहा किलोला ५२१ रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती सचिव रूपेश कवडे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या लिलवात एक नंबर कांद्यास प्रति दहा किलोस ते ५२१ रुपये बाजारभाव मिळाला तर एक नंबर सुपर गोळा जुन्या कांद्यास प्रति दहा किलोस ४५१ ते ५०१ रुपये भाव मिळाला होता.

तसेच एक नंबर कांद्यास ४२१ ते ४५१ रुपये भाव मिळाला‌. दोन नंबर कांद्यास ४०० ते ४२१ रुपये भाव मिळला. तर तीननंबर कांद्यास प्रति दहा किलोस २५० ते ३५० रुपये भाव मिळाला. तर चिंगळी (सर्वांत लहान कांदा) कांद्यास प्रति दहा किलोस ८० ते २५० रुपयांचा भाव मिळाला.

दरम्यान सरकारने कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे बाजारभाव निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) शेतकरी संतप्त झाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बाजार समितीत सुरू असलेले कांदा लिलाव बंद पाडल्याने काही काळ बाजार समिती परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी, सरकारने कांद्याची निर्यात सुरू न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. अद्याप कांदा निर्यात बंद असून ती सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT